अमरावती : “संभाजी भिडे याच्यामागे सत्ताधारी आहेत. याच्यामागे हेच लोक असून त्यांचाच हात आहे, नाहीतर काल त्यांचा खासदार अनिल बोंडे कशासाठी आंदोलनात उतरला असता? असं म्हणतं काँग्रेस नेत्या आणि आमदार यशोमती ठाकूर यांनी थेट आरोप केला आहे. यशोमती ठाकूर यांनी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान प्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्याविरोधात घेतलेल्या भूमिकेनंतर त्यांना “तुमचाही दाभोळकर करु” अशी धमकी […]
मुंबई : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे प्रमुख संभाजी भिडे यांच्याविरोधात घेतलेल्या भूमिकेमुळे काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना आलेल्या धमकीचे प्रकरण ताजे असतानाच आता आणखी एका काँग्रेस नेत्याला धमकी देण्यात आली आहे. काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांना ट्विटरवरुन धमकी देण्यात आली आहे. “दाभोलकर असाच ओरडत होता, एक दिवस जन्नतमध्ये […]
मुंबई : राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचे प्रकरण पुन्हा एकदा न्यायालयात गेले आहे. मुख्य याचिकाकर्त्यांनी आधीची याचिका मागे घेतल्यानंतर दुसऱ्या याचिकाकर्त्यांना उच्च न्यायालयात जाण्याची मुभा सर्वोच्च न्यायालयाने दिली होती. त्यानुसार कोल्हापूरचे ठाकरे गटाचे शिवसेना शहरप्रमुख सुनील मोदी यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावर उद्या (सोमवारी) सुनावणी होण्याची शक्यता असून स्थगितीबाबत काय होणार हे […]
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे येत्या मंगळवारी (1 ऑगस्ट) एकाच मंचावर येणार आहेत. दरवर्षी लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीदिनी पुण्यात 1 ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार दिला जातो. यावर्षी हा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला आहे. या कार्यक्रमसाठी शरद पवार प्रमुख पाहुणे असणार आहेत. पण या सोहळ्याची […]
कराड : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांना धमकीचा मेल आला आहे. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त व्यक्तव्याप्रकरणी चव्हाण यांनी कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर त्यांना धमकीचा ईमेल आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरानंतर चव्हाण यांच्या कराड येथील निवासस्थानाची सुरक्षा वाढविण्यात आली आहे. तसंच कराड शहर पोलीस […]
राजस्थानमधील उदयपूरमधून एक अत्यंत हृदयद्रावक बातमी समोर आली. एका जन्मदात्या आईने आपल्या 14 वर्षांच्या मुलाचाच खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आज (रविवारी) सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पुर्जन्य (वैष्णव) पारेख असं मृत मुलाचं नाव आहे. तर मनीषा पारेख असं आरोपी आईचं नाव आहे. आरोपी आई 5 वर्षांपासून मानसिकरित्या आजारी असल्याची माहिती आहे. […]
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आता दक्षिण भारतात पक्षविस्ताराला सुरुवात केली आहे. शिवसेना सचिव कॅप्टन अभिजीत अडसूळ यांनी नुकताच दक्षिण भारताचा दौरा केला. यावेळी तामिळनाडूतील शिवसेना प्रभारी अँड. राजेश कुमार आणि केरळ राज्यप्रमुख अँड. हरीश कुमार यांच्या उपस्थितीमध्ये तिथल्या महत्वाच्या पदाधिकाऱ्यांसोबत राज्यस्तरीय बैठक आणि पत्रकार परिषद पार पडली. याबाबत शिवसेनेने ट्विट करुन माहिती […]
Qin Gang : येथील कम्यूनिस्ट पक्षाने परराष्ट्र मंत्री किन गँग यांची मंत्रीपदावरुन हकालपट्टी केली आहे. किन गँग यांची गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये परराष्ट्र मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र 25 जूनपासून ते सार्वजनिक जीवनातून गायब आहेत. गत आठवड्यात जकार्ता येथे झालेल्या आसियान परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीतही किन गँग अनुपस्थित होते. तर नुकत्याच सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या […]
मुंबई : पाटना आणि बंगळूरुनंतर इंडिया आघाडीची तिसरी बैठक मुंबईत होणार आहे. मात्र अद्याप या बैठकीची तारीख निश्चित झालेली नाही. काही पक्षांकडून 25 आणि 26 ऑगस्ट या तारखांचा प्रस्ताव देण्यात आला आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या व्यस्त दौऱ्यांमुळे या तारखेवर शिक्कामोर्तब झालेला नाही. त्यामुळे इंडिया आघाडीची आगामी बैठक सप्टेंबरमध्ये होण्याची शक्यता व्यक्त […]
एका कथित लाल डायरीच्या आरोपांनी राजस्थानच्या राजकारणात सध्या वादळ आणलं आहे. राजस्थानच्या विधानसभेपासून ते दिल्लीपर्यंत या ‘लाल डायरी’ प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटले आहेत. राज्यातील विरोधी पक्ष असलेल्या भाजपला मागच्या 4 वर्षांमध्ये गेहलोत सरकारविरोधात कोणताही मोठा आणि ठोस मुद्दा मिळाला नव्हता. पण आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर लाल डायरीच्या रुपाने भाजपच्या हातात आयत कोलित मिळालं आहे. (The […]