दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधी इंडिया आघाडीला मोठा धक्का बसला आहे. इंडिया आघाडीने लोकसभेत मणिपूरच्या मुद्द्यावरुन मोदी सरकारविरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावाला ओडिसामधील सत्ताधारी बिजू जनता दलाने पाठिंबा जाहीर केला आहे. तसंच दिल्ली अध्यादेशाच्या मुद्द्यावरही बिजू जनता दल मोदी सरकारला पाठिंबा देणार आहे. या दोन्हीसाठीचा व्हिप आज (1 ऑगस्ट) बिजू जनता दलाच्या खासदारांसाठी काढण्यात आला. […]
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्यात विविध विकास कामांचे लोकार्पण करण्यात आले. लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान सोहळ्यानंतर पुणे पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर हा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी बोलताना मोदी यांनी महाराष्ट्रतील शिंदे-फडणवीस-पवार यांच्या नेतृत्वातील सरकारच्या कारभाराचे तोंड भरुन कौतुक केले. तर कर्नाटक आणि राजस्थानमधील उदाहरण देत काँग्रेसवर टीका केली. (Prime Minister Narendra Modi […]
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (1 ऑगस्ट) पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांचं पुणेकरांनी अत्यंत उत्साही वातावरणात स्वागत केलं. दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पूजा केल्यानंतर ते एसपी कॉलेज मैदानावरील लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराच्या कार्यक्रमासाठी रवाना झाले. तिथून ते शिवाजीनगर येथील पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विकासकामांसाठी रवाना झाले. (Citizens of Manipur living in Pune staged protests […]
पुणे : काशी आणि पुणे या दोन्ही शहरांची विशेष ओळख आहे. विद्वत्ता इथे चिरंजीव आहे, अमर आहे. पुणे नगरी विद्वत्तेची दुसरी ओळख आहे. तिथं माझा सन्मान होणं यापेक्षा आयुष्यात अभिमानाची आणि समाधानाची भावना असू शकत नाही, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भावना व्यक्त केल्या. ते पुण्यात लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर बोलत होते. यावेळी […]
Pune : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज (1 ऑगस्ट) पुणे दौऱ्यावर येत आहे. त्यांच्या या दौऱ्याच निमित्त आहे ते लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार. मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. याशिवाय त्यांच्या हस्ते पुणे मेट्रोच्या पुढच्या टप्प्याचे उद्घाटन होणार आहे. मात्र हा पुरस्कार नक्की कुणाला दिला जातो? असं काय आहे की या […]
मुंबई : मागील काही दिवसांपासून समृद्धी महामार्गावरील अपघात चर्चेचे कारण ठरत आहेत. अशात समृद्धी महामार्गावर आणखी एक मोठा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. शहापूर तालुक्यातील सरलांबे येथे महामार्गाचे काम चालू असताना ब्रीज गर्डरला जॉईन करणारी क्रेन खाली पडल्याने किमान 12 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये बहुतांश कामगारांचा समावेश आहे. क्रेन साधारण 100 […]
सांगली : भारत राष्ट्र समितीचे प्रमुख आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव मंगळवारी (1 ऑगस्ट) महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. यापूर्वीच्या महाराष्ट्र दौऱ्यांमध्ये त्यांनी विदर्भ, मराठवाडा, सोलापूरच्या या भागात उपस्थिती दर्शविली होती. त्यानंतर यावेळी ते पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील विविध कार्यक्रमांना चंद्रशेखर राव उपस्थित राहणार आहेत. (Telangana Chief Minister Chandrasekhar Rao […]
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी (1 ऑगस्ट) पुणे दौऱ्यावर येत आहेत. लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीदिनी टिळक स्मारक मंदिर ट्रस्टच्या वतीने ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने’ मोदी यांना गौरविण्यात येणार आहे. याशिवाय त्यांच्या हस्ते पुणे मेट्रोच्या पुढच्या टप्प्याचे उद्घाटन होणार आहे. दरम्यान, मोदी यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल करण्यात आला आहे. […]
महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून डोळे येणे या आजाराची लाट आली आहे. सार्वजनिक आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार राज्यात डोळे येणे आजाराचे आतापर्यंत 39 हजार 426 रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर सर्व जिल्ह्यांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईत अद्याप या आजाराचा उद्रेक झाला नसला तरीही महापालिकेनेही सर्वांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. (Over 39,000 cases of […]
मुंबई : सातत्याने येत असलेल्या तक्रारी लक्षात घेत केंद्र सरकारने प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा अर्ज भरण्यास तीन दिवसांची मुदत वाढ दिली आहे. कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी याबाबतची माहिती दिली. याआधी 31 जुलै ही शेवटची तारीख होती, मात्र पावसामुळे गावांचा संपर्क तुटणे, नेटवर्क नसणे, सर्व्हर डाऊन होणे अशा विविध कारणांमुळे शेतकऱ्यांना विमा भरण्यास अडचण येत असल्याच्या […]