मुंबई : विधानसभेच्या विरोधी पक्ष नेतेपदी विजय वडेट्टीवर (Vijay Vadettivar) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी वडेट्टीवार यांच्या नावाची घोषणा केली. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी वडेट्टीवार यांना त्यांच्या जागेवर स्थानापन्न केले. दरम्यान, वडेट्टीवार विरोधी पक्ष नेत्यांच्या जागेवर जात असतानाच “आता तिकडे जाऊ नका, परत […]
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जागी अजित पवार (Ajit Pawar) येणार अशा चर्चा मागील अनेक दिवसांपासून सुरु आहेत. त्याबाबत स्वतः शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेकदा खुलासा करुन या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. मात्र या ना त्या कारणामुळे या चर्चा सातत्याने डोकं वर काढतात. आता पुन्हा एकदा या चर्चांना सुरुवात होण्याचे कारण म्हणजे […]
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा मंगळवारी (1 ऑगस्ट) बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित पुणे दौरा पार पडला. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराचा सोहळा, मेट्रो प्रकल्पाचा दुसरा टप्पा आणि पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा त्यांच्या उपस्थितीत पार पडला. दरम्यान, पंतप्रधानांच्या या दौऱ्यात पुण्याच्या रखडलेल्या प्रकल्पांबाबतही चर्चा केली आहे, त्यामुळे आगामी काळात या प्रकल्पांना निश्चित […]
Nitin Desai’s suicide : पुणे : नितीन देसाई हे माझे अत्यंत चांगले मित्र आणि स्नेही होते. त्यांनी मध्यंतरी राज्य सहकारी बँकेकडे 300 कोटी रुपयांच्या कर्जाची मागणी केली होती. त्यानिमित्ताने मी त्यांच्या कर्जत येथील स्डुडिओलाही भेट दिली होती. मात्र फिजीबिलीटी नसल्यामुळे मी त्यांना आर्थिक मदत करु शकलो नव्हतो, असं म्हणतं राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर […]
पुणे : शिंदे सरकारमध्ये राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा समावेश झाल्यानंतर खातेवाटप झाले, मात्र अद्याप पालकमंत्र्यांची नव्याने घोषणा करण्यात आलेली नाही. यात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना पुण्याचे पालकमंत्रीपद मिळण्याच्या चर्चा आहेत. मात्र अद्याप त्याबाबत कोणताही घोषणा झालेली नाही. परंतु या घोषणेची वाट न बघता अजित पवार उपमुख्यमंत्री म्हणून कामाला लागले आहेत. आता दर आठवड्याला एक दिवस […]
मुंबई : माजी आयपीएस अधिकारी प्रताप दिघावकर आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये दिघावकर यांचा पक्षप्रवेश होणार आहे. दिघावकर हे 1987 मध्ये उपअधीक्षक म्हणून पोलिसात रुजू झाले आणि 2001 मध्ये त्यांची आयपीएसमध्ये नियुक्ती झाली होती. (Former Indian Police Service officer Pratap Dighavkar will join the Bharatiya […]
मुंबई : शहापूरजवळील सरलांबे येथे समृद्धी महामार्गाचे काम चालू असताना ब्रीज गर्डरला जॉईन करणारी क्रेन खाली पडल्याने मोठा अपघात घडला. 1 ऑगस्टच्या रात्री या भीषण अपघातात 20 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, सरकारकडून या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र या अपघाताच्या घटनेचे पडसाद आज (2 ऑगस्ट) राज्याच्या विधानसभेतही पाहायला मिळाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]
मुंबई : सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई (Nitin Chandrakant Desai) यांच्या आत्महत्येने मोठी खळबळ उडाली आहे. कर्जत येथील एन.डी. स्टुडिओमध्ये गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं. देसाईंच्या आत्महत्येनं हिंदी आणि मराठी सिनेमासृष्टीवर शोककळा पसरली आहे. उरणचे अपक्ष आमदार महेश बालदी यांनी दिलेल्या माहितीनुसार, देसाई मागील काही दिवसांपासून आर्थिक अडचणीत होते. यातूनच त्यांनी आत्महत्या केली. (Zone 2 […]
मुंबई : जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये आरपीएफ कॉन्स्टेबल चेतन सिंह याने घडवून आणलेल्या हत्यांकांडातील चौथ्या मृत व्यक्तीची ओळख पटली आहे. सय्यद सैफुल्ला (43, रा. हैदराबाद) असं चौथ्या मृत व्यक्तीचे आहे. इतर तीन मृतांची ओळख यापूर्वीच पटली होती. सहाय्यक उपनिरीक्षक टिकाराम मीना (57, रा, सवाई माधोपूर, राजस्थान), असगर अब्बास अली (48, रा. मधुबनी, बिहार) अब्दुल कादर मोहम्मद हुसेन […]
उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये सध्या IPS प्रभाकर चौधरी यांची जोरदार चर्चा सुरु आहे. दोन दिवसांपूर्वी ते बरेली जिल्ह्याचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक म्हणून काम पाहत होते. मात्र जिल्ह्यातील नवादा येथे कावड यात्रेकरुंवरील लाठीचार्ज प्रकरणी त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. चौधरी यांची मागील 13 वर्षांमधील ही 21 वी बदली ठरली आहे. तर आठ वर्षामधील 18 वी बदली ठरली […]