बुलढाणा : स्वाभिमानी शेतकरी संघटना पुन्हा एकदा फुटीच्या उंबरठ्यावर आहे. संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांची नाराजी अद्याप कायम आहे. अशात तुपकरांनी शिस्त पालन समितीच्या बैठकीकडे पाठ फिरवली आहे. यावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी तुपकरांवर चांगलाच संताप व्यक्त केला. त्यांच्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठीच शिस्त पालन समिती होती. मात्र या बैठकीकडे पाठ फिरणे हा […]
जेजुरी : केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी मागील 20-22 वर्षांपासून रखडलेलं काम मार्गी लावलं. देशातील साखर कारखान्यांना जवळपास 15 हजार कोटी रुपयांचा इन्मक टॅक्स लागला होता. आपल्या देशात ही रक्कम साडे सात ते 9 हजार कोटी रुपये होते. हा सगळा टॅक्स माफ केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता टनाला किमान 500 रुपये भाव जास्त […]
मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर राष्ट्रीय सहकार विकास निगमकडून महाराष्ट्रातील 6 सहकारी साखर कारखान्यांना 559 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले आहे. हे सर्व साखर कारखाने भाजपच्या सक्रिय राजकीय नेत्यांशी संबंधित आहेत. मागील जवळपास एका वर्षांपासून या कर्जासाठी भाजपच्या नेत्यांचे प्रयत्न सुरु होते. मात्र अटी-शर्तींची पूर्तता होत नसल्याचा दावा करत राष्ट्रीय सहकार विकास […]
मुंबई : निवडणुकांच्या तोंडावर पक्षातील आव्हानांवर मात करण्यासाठी भाजपने (BJP) येत्या 18 ऑगस्ट रोजी सर्व आमदारांची बैठक बोलावली आहे. मुंबईतील भाजप मुख्यालयात ही बैठक बोलविण्यात आली आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) मार्गदर्शन करणार आहेत. येत्या मार्च-एप्रिल 2024 मध्ये लोकसभा आणि सप्टेंबर-ऑक्टोबर 2024 मध्ये विधानसभेच्या निवडणुका होण्याची […]
– ऋषिकेश नळगुणे : जयंत पाटील शरद पवार यांची साथ सोडणार, जयंत पाटील भाजपच्या संपर्कात, जयंत पाटील अजितदादांसोबत जाणार अशा बातम्या मागील काही दिवसांपासून आपण सातत्याने ऐकत आहोत. या बातम्यांमध्ये कितपत तथ्य आहे सर्वसामान्य जनतेच्या लक्षात येण्यापूर्वीच काल बातमी आली की जयंत पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. भाजपकडूनही कोणती प्रतिक्रिया न […]
सांगली : भाजपचे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांची भेट घेतली. आज (7 ऑगस्ट) संभाजी भिडे यांच्या निवासस्थानी दोघांची भेट झाली. दोघांमध्येही बंद दाराआड जवळपास अर्धा तास चर्चा झाली. दरम्यान, या भेटीमागे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कनेक्शन असल्याची जोरदार चर्चा सध्या जिल्ह्यात सुरु आहे. मागील काही दिवसांपासून […]
मुंबई : “जसं मांजरीनं स्वतःची पिल्ल खाती तसं राजू शेट्टी हा मांजरीची जात आहे. तो स्वतःची पिल्ल खातो. कार्यकर्ता मोठा नाही झाला पाहिजे, कार्यकर्त्याला काही मिळालं नाही पाहिजे, अशी भावना या माणसाच्या मनात असते”, असं म्हणत रयत क्रांती संघटनेचे प्रमुख आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी (Raju […]
बीड : नाशिकनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची दुसरी सभा बीडमध्ये होणार आहे. 17 ऑगस्टला त्यांची ही सभा पार पडणार आहे. या सभेच्या आयोजनाची संपूर्ण जबाबदारी जिल्ह्यातील शरद पवार यांच्यासोबत असलेले एकमेव आमदार संदीप क्षीरसागर यांना देण्यात आली आहे. या निमित्ताने आता पवार येत्या काळात छगन भुजबळा यांच्यापाठोपाठ धनंजय मुंडे यांच्याविरोधात वातावरण तापविताना दिसून […]
मुंबई : विधानसभेतील विरोधी पक्ष नेतेपदानंतर आता काँग्रेसने विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेतेपदावरही दावा ठोकला आहे. काँग्रेसच्या 9 पैकी 6 आमदारांनी याबाबत थेट काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांना पत्र लिहिलं आहे. त्यांच्याकडून ग्रीन सिग्नल मिळताच उपसभपती नीलम गोऱ्हे यांच्याकडे यासाठी दावा करण्यात येणार आहे, अशी माहिती आहे. काँग्रेसचे आमदार धीरज लिंगाडे यांनीही या ‘लेट्सअप […]
मुंबई : पावसाळी अधिवेशनात अखेरच्या दिवशी विधान परिषदेत नाट्यमय घडामोड पाहायला मिळाली. लंच ब्रेकपूर्वी दोन मिनिटे आधी भाजपने अचानकपणे उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या बाजूने विश्वासदर्शक ठराव मांडला आणि आवाजी मदतानाने मंजूरही करुन घेतला. संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या दाव्यानुसार आता पुढील एक वर्ष गोऱ्हे यांच्याविरोधात अविश्वास ठराव मांडता येणार नाही. त्यामुळे आता एका वर्षासाठी […]