मुंबई : लाखो मराठा समाजबांधवांसह मुंबईच्या वेशीवर धडकलेल्या मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या आंदोलनाला अंशतः यश आले आहे. त्यांनी शिंदे सरकारकडे (Shinde Government) केलेल्या दहा मागण्यांपैकी पाच मागण्या मान्य झाल्या आहेत. मात्र अद्यापही त्यांचा पाच मागण्यांबाबत सरकारी पातळीवर चर्चा सुरु असल्याची माहिती आहे. याबाबत नेमका कधी आणि काय निर्णय होणार […]
सध्या देशाच्या राजकारणाचे लक्ष बिहारकडे लागले (Bihar Politics) आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) आता कोणत्याही क्षणी महागंठबधनची साथ सोडून पुन्हा भाजपासोबत (BJP) जाऊ शकतात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. येत्या 28 जानेवारी रोजी त्यांचा भाजपाबरोबर शपथविधी होईल अशा चर्चा माध्यमांतून सुरू झाल्या आहेत. बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्यासाठी हा मोठा […]
मुंबई : मराठा समाजातील ज्यांच्या 54 लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांच्या सग्यासोयऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्याचा अध्यादेश आज रात्री काढा, अन्यथा उद्या (27 जानेवारी) मुंबईत आझाद मैदानावर धडक देणारच, असा इशारा मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी शिंदे सरकारला (Shinde Government) दिला आहे. नवी मुंबईमध्ये शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेनंतर त्यांनी […]
मुंबई : मराठा आरक्षणाचा प्रश्न 100 टक्के निकाली निघत नाही तोपर्यंत सरकारी नोकर भरती करु नका, अशी मोठी मागणी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी केली आहे. शिंदे सरकारच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेनंतर त्यांनी वाशीमध्ये उपस्थितांना संबोधित केले. यावेळी शिष्टमंडळासोबत काय-काय चर्चा झाली याबाबत त्यांनी माहिती दिली. (Manoj Jarange Patil has demanded […]
असे म्हणतात की राजकारण आणि विचारधारा या एकमेकांचा हात हातात धरुन समांतर चालणाऱ्या दोन गोष्टी. दोन्ही गोष्टी एकमेकांशी संलग्न असतात. उदाहरण द्यायचेच झाले तर जशी भाजपची विचारधारा हिंदुत्ववादी तर काँग्रेसची सर्वधर्मसमभाव अशी आहे. याच विचारधारेमुळे तुम्ही निवडणुकीमध्ये लोकांपुढे कोणते मुद्दे घेऊन जाणार, लोक तुम्हाला का मते देणार, लोक तुमच्यावर का विश्वास ठेवणार अशा अनेक प्रश्नांची […]
परभणी लोकसभा मतदारसंघ. गेल्या तीन दशकांपासून शिवसेनेला (Shiv Sena) असलेला विजयाचा आशीर्वाद पण त्याच जोडीला लाभलेला पक्षांतराचा शाप, असे दोन शब्दात परभणी लोकसभा मतदारसंघाचे (Lok Sabha) वर्णन करता येईल. पण संजय जाधव यांनी हा शाप धुवून काढला आणि शिवसेनेला पवित्र करत भगवा या मतदारसंघात फडकविता ठेवला. आता पुन्हा एकदा संजय जाधव (Sanjay Jadhav) लोकसभा गाठण्यासाठी […]
मुंबई : 2014 आणि 2019 या दोन्ही मोदी लाटेत देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यासोबत सर्वाधिक मताधिक्याने निवडून आलेले फार थोडे उमेदवार आपल्याला सांगता येतील. याच फार थोड्यामध्ये मुंबई उत्तर मतदारसंघाचे खासदार गोपाळ शेट्टी (Gopal Shetty) यांचे नाव घ्यावे लागते. 2014 मध्ये तब्बल चार लाख 46 हजार आणि 2019 मध्ये चार लाख 65 हजार […]
मुंबई : गुणरत्न सदावर्ते यांच्या याचिकेनंतर मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना नोटीस बजावली आहे. मनोज जरांगे पाटील आणि मराठा आरक्षण मोर्चा (Maratha Reservation) मुंबईत आल्यास इथले जनजीवन विस्कळीत होईल. त्यामुळे त्यांना मुंबईत येण्यासपासून थांबवावे. त्यांना मुंबईत आंदोलनाची परवानगी देण्यात येऊ नये, अशी मागणी करत […]
मुंबई : मागील अनेक दिवसांपासून रायगडच्या पालकमंत्रीपदावरुन सुरु असलेल्या वादात राष्ट्रवादीची (NCP) सरशी झाली आहे का? असा सवाल सध्या उपस्थित होत आहे. याचे कारण म्हणजे, यंदा प्रजासत्ताक दिनी रायगड जिल्ह्यात ध्वजारोहण करण्याचा मान मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkre) यांना देण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णयही प्रसिद्ध झाला आहे. राज्य शासनाकडून येत्या 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक […]
पुणे : अवघ्या देशवासियांचे लक्ष लागून राहिलेल्या अयोध्येतील (Ayodhya) प्रभू श्रीराम मंदिराचा लोकार्पण आणि प्राणप्रतिष्ठा सोहळा नुकताच पार पडला. पवित्र मंत्रोच्चार, शंखनाद आणि आणि जय श्री रामाच्या घोषणेसह प्रभू श्रीराम तंबूमधून भव्य मंदिरात विराजमान झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते विधिवत पूजा करून मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. हा प्राणप्रतिष्ठेचा सोहळा अवघ्या देशाने याची […]