- Letsupp »
- Author
- kabir letsupp
kabir letsupp
kabir letsupp
कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
-
तुमची लायकी सरपंच निवडणुकीची, लोकसभा लढवायची खाज असेल तर…; राऊतांना राणेंचं आव्हान
Nitesh Rane on Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे आमच्या जीवावर खासदार झाले असं शिंदे गटाच्या नेत्यांनी अनेकदा बोलून दाखवलं. मात्र, आता या सगळ्यांना चोख उत्तर देण्यासाठी संजय राऊत लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. त्यांनी ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे संकेत दिले. दरम्यान, यावरून आता भाजपचे आमदार नितेश […]
-
समृध्दी महामार्गावर फोटो किंवा रील्स काढाल तर तुरुंगात जाल, महामार्ग पोलिसांचा इशारा
Samruddhi Mahamarg : गेल्या काही दिवसापासून विकासाचा महामार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समृध्दी महामार्गावर ( Samruddhi Mahamarg) तरुण-तरुणींकडून फोटो, रील्स काढण्याचे प्रकार वाढले आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दौलताबादजवळ समृध्दी महामार्गावरील पुलावर हुल्लडबाज तरुण रील्स (Reels) काढत असल्याचं आढळून आलं. यानंतर महामार्ग वाहतूक पोलिसांसह जिल्हा वाहतूक शाखेने याची गांभीर्याने दखल घेतली. समृद्धीवर हुल्लडबाजी करणार्यांना आता एक महिन्याचा […]
-
बडा नेता अजितदादांच्या गळाला? माजी मुख्यमंत्र्यांनी घेतली प्रफुल्ल पटेलांची भेट
Churchill Alemao : गोवा : माजी मुख्यमंत्री चर्चिल आलेमाओ (Churchill Alemao) यांनी तृणमूल काँग्रेसला रामराम ठोकला आहे. त्यांनी नुकतीच राष्ट्रवादी (अजित पवार) खासदार प्रफुल्ल पटेल यांची भेट घेतली आहे. त्यामुळे आलेमाओ लवकरच ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील होण्याची शक्यता आहे. आलेमाओ यांनी आतापर्यंत पाचवेळा आमदार, दोनवेळा खासदार आणि एकदा मुख्यमंत्रीपद भूषविले आहे. त्यामुळे […]
-
आंबेगाव त्यांना नक्कीच धडा शिकवेल, हा माणूस अत्यंत कृतघ्न निघाला; वळसे पाटलांवर आव्हाडांची टीका
Jitendra Awhad on Dilip Walse-Patil : अजित पवारांसह (Ajit Pawar) काही आमदारांनी राष्ट्रवादीत बंड करून शिंदे-भाजप सरकारला पाठिंबा दिला. तेव्हापासून दोन्ही गटांचे नेते एकमेकांवर टीका करत आहेत. आता पहिल्यांदाच मंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse-Patil) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. शरद पवार हे कधीच स्वबळावर मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत. मोठे नेते असूनही […]
-
‘मलाही ईडीची नोटीस येऊ शकते’; रोहित पवाराचं मोठं विधान
Rohit Pawar : राष्ट्रवादीत (NCP) बंडाळी करत अजित पवार (Ajit Pawar) आणि समर्थक आमदार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झालेत. अजित पवार, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल यासारखे दिग्गज नेत्यांनी जर शरद पवारांची (Sharad Pawar) साथ सोडली तरी रोहित पवार (Rohit Pawar) हे शरद पवारांसोबत खंबीरपणे उभे आहेत. नुकताच त्यांनी मराठवाड्याचा दौरा करून संघटन मजबुत करण्यावर भर दिला […]
-
पावसाची प्रतीक्षा वाढली! ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात कोकण आणि विदर्भातच पाऊस
मुंबई : देशात यंदा मान्सूनच्या पावसाचं (Rain update) आमगन उशिरानं झालं होतं. मात्र, जुलै महिन्यात चांगला पाऊस झाला होता. पावसाचा असाच जोर कायम राहिल असं वाटत होतं. मात्र, ऑगस्ट महिन्यात पावसाने सुट्टी घेतली. त्यामुळं ऑगस्टच्या पहिल्या दोन आठवड्यात पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे पाऊस कधी पडणार याकडे शेतकऱ्यांसह सर्वांचे लक्ष लागलं आहे. कोकण आणि […]
-
भ्रष्टाचारात भारताचे गृहमंत्रालयच अव्वल! रेल्वे अन् बँक अधिकाऱ्यांचा नंबर दुसरा
नवी दिल्ली : भ्रष्टाचाराचाला (Corruption) आळा बसावा यासाठी सरकार अनेक प्रयत्न करत असते. मात्र, दिवसेंदिवस भ्रष्टाचारात वाढ होत असल्याचं दिसतं आहे. भ्रष्टाचारात गृहमंत्रालयच (Ministry of Home Affairs) अव्वल स्थानी असल्याच समोर आलं. गेल्या वर्षी केंद्रीय गृहमंत्रालयातील अधिकाऱ्यांविरोधात भ्रष्टाचाराच्या सर्वाधिक तक्रारी आल्याचं केंद्रीय दक्षता आयोगाच्या (CVC) नुकत्याच जाहीर केलेल्या अहवालातून समोर आलं. या वार्षिक अहवालानुसार, गृहमंत्रालयानंतर […]
-
उत्तर भारतीय रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी, 37 हजार रुपये वेतन; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज
Indian railways job : भारतीय रेल्वेचे जाळे देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहे. दररोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. रेल्वेच्या या विभागाच्या देखभालीसाठी रेल्वे मंत्रालयाला मनुष्यबळाची आवश्यकता आहे. यासाठी रेल्वे प्रशासन भरती प्रक्रिया राबवते. आताही रेल्वे विभागात नोकरी शोधत असलेल्या युवकांसाठी एक गुड न्यूज आहे. नुकतीच उत्तर भारतीय रेल्वेनं वरिष्ठ तांत्रिक सहयोगी पदासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून […]
-
मुंबईत आजपासून प्लॅस्टिक पिशवी बंद, नियमांचे उल्लंघन केल्यास होणार कडक कारवाई
मुंबई : भाजीपाला, दूध, फळं किंवा किरकोळ वस्तू खरेदी करताना प्लॅस्टिकच्या कॅरीबॅग बाळगणे किंवा दुकानदाराकडून कोणतीही वस्तू प्लॅस्टिकच्या कॅरीबॅगमध्ये घेणे आता महाग होणार आहे. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी मुंबई महापालिकेने (Mumbai Municipality) प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी (Ban plastic bags) घातली असून आजपासून प्लॅस्टिक पिशवी आढळल्यास धडक कारवाई करण्यात येणार आहे. दुकानदार, फेरीवाले आणि मॉल्सवर एका पोलीस अधिकाऱ्यासह […]
-
पद्म पुरस्कारासाठी अशोक सराफ यांची शिफारस करणार, मंत्री मुनगंटीवार यांची घोषणा
पुणे : ज्येष्ठ मराठी अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांच्या नावाची राज्य सरकारकडून पद्म पुरस्कारासाठी शिफारस करण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी केली. यासोबतच शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर संशोधन करणाऱ्या १०० विद्यार्थ्यांना प्रत्येकी दीड लाख रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाणार असल्याचीही घोषणा त्यांनी केली. बालगंधर्व रंगमंदिरात अशोक […]









