- Letsupp »
- Author
- kabir letsupp
kabir letsupp
kabir letsupp
कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
-
८७ कोटींची निधी मंजूर होऊनही पाणी पुरवठा योजनेला विलंब; शेवगावमध्ये बेमुदत उपोषण
अहमदनगर : सुमारे ६० हजाराच्या आसपास लोकसंख्या असलेल्या शेवगाव शहरासाठी शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण निधीतुन सुमारे ८७ कोटी रुपयांचा निधी राज्य शासनाने मंजूर करून जवळपास ४ महिन्याचा कालावधी लोटला आहे. मात्र निविदा प्रक्रियेला विलंब होत आहे. त्यामुळे पाण्याच्या टंचाईची समस्या तीव्रतेने वाढत आहे. परिणामी, नागरिकांना गैरसोयीचा सामना सहन करावा लागत आहे. दरम्यान, निविदा प्रक्रियेला जाणीवपूर्वक विलंब करून […]
-
कृषी वैज्ञानिक निवड मंडळात 195 पदांची भरती, पगार 56 हजार ते 1 लाख 77 हजार रुपये प्रति महिना
सरकारी नोकरीच्या (Govt job) शोभात असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. कृषी वैज्ञानिक निवड मंडळातर्फ (Agricultural Scientific Selection Board) भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या नोटिफिकेशनमध्ये या भरती संबंधित माहिती दिली आहे. या नोटीफिकेशमध्ये भरल्या जाणाऱ्या एकूण रिक्त पदांचा तपशील, शैक्षणिक अर्हता, अर्ज शुल्क, निवड प्रक्रिया याबाबतचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. या […]
-
तासिका तत्वावरील अध्यापकांसाठी आनंदाची बातमी, मानधनात होणार वाढ; चंद्रकांत पाटलांची माहिती
मुंबई : राज्यात गेल्या अनेक वर्षापासून अध्यापक भरती ही बंद आहे. त्यामुळं पर्यायी व्यवस्था म्हणून तासिका तत्वावर अध्यापकांना संस्था, महाविद्यालयांमध्ये शिकवण्यासाठी नियुक्त केलं जातं. त्यांना मिळणार वेतन हे अपुरं असल्याची सातत्याने ओरड होते. आजच्या महागाईच्या काळात मिळणारं तासिका वेतन हे अत्यल्प असल्यानं तासिका वेतन वाढवण्यात यावे, अशी मागणी राज्यातील अध्यापक संघटनांनी केली होती. दरम्यान, आता […]
-
सरकारी कर्मचाऱ्यांचे लाड थांबवा, अन् आता शेतकऱ्यांना पेन्शन द्या; सरपंचाचे थेट सीएम शिंदेंना पत्र
पुणे : गेल्या काही दिवसांपासून जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी यासाठी राज्यभरात 17 लाखांहून अधिक शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाचे हत्यार उपसलं आहे. या संपामुळे सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, अजूनही संपकरी आणि सरकारमध्ये सकारत्मक बोलणं न झाल्याने जनतेची अनेक सरकारी कामं खोळंबली आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र […]
-
‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटाचा टीझर रिलीज, अंकुशच्या भूमिकेनं वेधलं लक्ष
मराठी चित्रपटसृष्टीला चांगले दिवस आले आहेत. गेल्या काही वर्षापासून मराठीत अनेक दर्जेदार चित्रपट बनत आहेत. मराठी प्रेक्षकही चित्रपटांना भरभरून प्रतिसाद देत आहेत. आताही असाच एक बहुचर्चित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. केदार शिंदे (Kedar Shinde) दिग्दर्शित कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ महाराष्ट्राचे लाडके शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारीत ‘महाराष्ट्र शाहीर’ (‘Maharashtra Shaheer’) हा चित्रपट प्रदर्शित होणार […]
-
आदित्य ठाकरेंनी प्रदूषण नियंत्रणासाठी केंद्राचा 3 हजार 600 कोटींचा निधी परत केला; आ. कोटेजा यांचा आरोप
मुंबई : महाविकास आघाडीच्या सरकारमधील माजी पर्यावरण मंत्री आणि आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांना मुंबईतील वाढत्या प्रदूषणावरुन पत्र लिहिले आहे. मात्र आदित्य ठाकरे हे स्वत: पर्यावरण मंत्री असताना मुंबईतील प्रदूषण नियंत्रणासाठी केंद्राने दिलेला 3 हजार 600 कोटी रुपयांचा निधी परत गेल्याचा आरोप भाजपकडून (BJP) करण्यात आला आहे. मुंबईत दिवसेंदिवस प्रदुषण वाढत […]
-
10वी पास असाल तर टपाल खात्यातील ही नोकरीची ही संधी सोडूच नका; महिन्याला पगार 63200 रुपये
जर तुम्ही चांगल्या दहावी उत्तीर्ण असाल आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर आपल्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, भारतीय टपाल विभागात आपल्यासाठी चांगली जॉबची संधी उपलब्ध झाली आहे. भारतीय टपाल खात्यामध्ये 10 पास असलेल्या उमेदवारांसाठी सरकारकडून भरती प्रक्रिया सुरू केली जात आहे. डाक विभागाने एकूण 58 कर्मचारी कार चालक पदांच्या जागांसाठी पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज […]
-
शिंदे-फडणवीस हे असंवेदनशील आणि वाचाळवीरांचं सरकार; सुप्रिया सुळेंचा घणाघात
पुणे : काही दिवसांपूर्वी राज्यात अवकाळी पाऊस झाला होता. त्या अवकाळी पावसानं शेतकऱ्यांची पिके मातीमोल केली. कांद्याला पुरेसं अनुदान नाही. कांद्याला भाववाढ नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी विधानभवनावर मोर्चा काढला होता. राज्यातील शेतकऱ्यांच्या या सर्व प्रश्नांवर भाष्य करत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. पुण्यातील कात्रज चौकाची पाहणी करतांना […]
-
Asim Sarode : ‘किरण रिजिजू हा माणूस मंत्री आहे, म्हणून काहीही बोललेले चालेल का?’
पुणे : काल एका कार्यक्रमात बोलतांना केंद्रीय कायदा मंत्री किरण रिजिजू (Union Law Minister Kiran Rijiju) यांनी मोठं वक्तव्य केलं. काही निवृत्त न्यायाधीश भारत विरोधी गॅंगचे भाग झाले आहेत आणि ते न्यायव्यवस्थेवर दबाब आणऊन न्यायालयांना विरोधी पक्षाची भूमिका करायला लावत आहे. त्याची त्यांनी किंमत मोजावी लागेल, असं वक्तव्य त्यांनी केलं. रिजिजू यांच्या वक्तव्यानंतर अनेक प्रतिक्रिया […]
-
अंबाबाई मूर्तीची झीज! पालकमंत्री दीपक केसरकरांनी बोलावली बैठक
कोल्हापूर : करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिर (Ambabai Temple) हे लाखो भाविकांचं श्रध्दास्थान आहे. मात्र, आता अंबाबाईच्या मूर्तीची (Idols of Ambabai) झालेली झीज हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. काही वर्षापूर्वी पुरातत्व खात्याकडून मूळ मूर्तीवर नैसर्गिक वज्रलेप आणि रासायनिक संवर्धनही करण्यात आलं होत. मात्र, तरीही मूर्तीची झीज होतचं आहे. दरम्यान, आज कोल्हापुरचे पालकमंत्री दीपक केसरकर (Guardian Minister Deepak […]










