मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी मुंबईत येणार असून मुंबई महानगरपालिका, मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आणि अन्य काही संस्थांच्या नागरी सुविधा प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: ट्वीट करून आपल्या मुंबई दौऱ्याची माहिती दिली आहे. ट्विट मध्ये म्हटले आहे की “मी […]
नवी दिल्ली : दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या एका आमदाराने दिल्ली विधानसभेत थेट नोटांचे बंडल दाखवून त्यांना लाच दिले जात असल्याचा गौम्यस्फोट केला आहे. दिल्लीतील रिठाला विधानसभा मतदारसंघाचे आपचे आमदार मोहिंदर गोयल यांनी नोटांचे बंडल विधानसभेत फिरवत त्यांना खरेदी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला आहे. दिल्लीतील आंबेडकर हॉस्पिटलमध्ये काही लोक पैसे घेऊन नोकऱ्या देत […]
निरोगी राहण्यासाठी सर्व जीवनसत्त्वे महत्त्वाची आहेत. आहारात अशा गोष्टींचा समावेश करावा, ज्यामध्ये भरपूर पोषक असतात. जर तुम्हाला दिवसभर थकवा किंवा अशक्तपणा वाटत असेल तर शरीरात लोहाची कमतरता असू शकते. त्याच्या कमतरतेमुळे शरीरातील ऊर्जा पातळी कमी राहते. ज्यामुळे तुम्ही अनेक धोकादायक आजारांना बळी पडू शकता. त्यामुळे लोहयुक्त पदार्थांचा आहारात समावेश केला जाऊ शकतो. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही या पेयांचे सेवन […]
हैदराबाद : भारतीय क्रिकेट संघ आज (बुधवार) हैदराबाद येथे 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात पाहुणे न्यूझीलंड (IND vs NZ) विरुद्ध खेळणार आहे. हा सामना राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जात आहे. टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली आणि शुभमन गिल याच्यासाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे. मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात दोन्ही फलंदाज आपल्या नावावर […]
नवी दिल्ली : भारतीय निवडणूक आयोगाने नागालँड, मेघालय आणि त्रिपुरातील विधानसभेच्या निवडणुकांच बिगुल वाजलं आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी ईशान्येकडील तीन राज्यांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्रिपुरामध्ये १६ फेब्रुवारीला आणि नागालँड-मेघालयात २७ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. तर 2 मार्च रोजी तिन्ही राज्यांमध्ये मतमोजणी होणार आहे. नागालँड, मेघालय आणि त्रिपुराच्या विधानसभांचा पाच वर्षांचा […]
मुंबई : दावोस (Davos) येथे गेल्या दोन दिवसांत विविध उद्योगांशी १ लाख ३७ हजार कोटी गुंतवणुकीचे (investment) सामंजस्य करार झाले आहेत.गुंतवणूकदारांचा राज्यावर विश्वास असून हे प्रकल्प लवकरात लवकर सुरु होतील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, राज्यात प्रथमच दावोस इथे इतक्या मोठ्या संख्येने करार झाले आहेत. उद्योग वाढीसाठी […]
पुणे : जी-20 (G-20) बैठकीसाठी आलेल्या प्रतिनिधींनी आज पुण्यातील (Pune) वारसास्थळांना भेट दिली. शनिवार वाड्याची (Shaniwar Wada) भव्यता पाहून पाहुणे स्तिमित झाले.तर, लालमहल भेटीप्रसंगी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास उत्सुकतेने जाणून घेतला. सकाळी शनिवार वाड्यापासून या भेटीला सुरूवात झाली. शनिवार वाड्याची भव्यता, प्रवेशद्वार, विस्तारलेला परिसर प्रतिनिधींनी आपल्या मोबाईलमध्ये टिपला. येथील इतिहासाविषयी उत्सुकतेने त्यांनी मार्गदर्शकांना प्रश्नही […]
पुणे : भारतीय क्रिकेट संघ मंगळवारी (17 जानेवारी) अचानक कसोटी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर पोहोचला. हे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. रँकिंग पाहून भारतीय चाहत्यांना आनंद झाला, पण त्यांचा आनंद अल्पकाळ टिकला. आयसीसीने साडेतीन तासांनंतरच भारताला पहिल्या स्थानावरून दूर केले. जेव्हा हे घडले तेव्हा लोक शोधू लागले की टीम इंडिया काही काळासाठी शीर्षस्थानी कशी गेली. या प्रकरणात […]