- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
ऋतुराज कसोटी मालिकेतून बाहेर, विराटही मायदेशी परतला; नेमकं कारण काय?
IND vs SA : भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यात 26 डिसेंबरपासून कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. याआधी विराट कोहली (Virat Kohali) भारतात परतला आहे. कोहली कौटुंबिक कारणामुळे परतला आहे. ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) कसोटी मालिकेतून बाहेर आहे. गायकवाड दुखापतग्रस्त असून तो अद्याप तंदुरुस्त झालेला नाही. टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील मालिकेतील […]
-
ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचे वर्चस्व, गोलंदाजांनंतर फलंदाजीही दमदार
INDW vs AUSW : मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारतीय महिला संघ आणि ऑस्ट्रेलिया महिला संघ (INDW vs AUSW) यांच्यात कसोटी सामना खेळला जात आहे. या कसोटीचा पहिला दिवस टीम इंडियाच्या नावावर होता. गोलंदाजांनंतर फलंदाजीतही भारतीय खेळाडूंनी पहिल्या दिवशी शानदार खेळ केला. ऑस्ट्रेलियन कर्णधार अॅलिसा हिलीने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेला ऑस्ट्रेलियन संघ […]
-
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. प्रभाकर मांडे यांचे निधन, यावर्षीचं पद्मश्रीने सन्मानित
Prabhakar Mande :डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी भाषा व वाङ्मय विभागातील संशोधक, लोकसाहित्याचे अभ्यासक पद्मश्री डॉ. प्रभाकर मांडे (Prabhakar Mande) यांचे अहमदनगर (Ahmednagar) येथे आज संध्याकाळी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. यावर्षीच प्रभाकर मांडे यांना पद्मश्रीने (Padmashri) सन्मानित केले होते. डाॅ. प्रभाकर मांडे यांचा जन्म छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सावखेड येथे 1933 मध्ये झाला होता. त्यांचे […]
-
Corona JN.1 Variant: मुख्यमंत्र्यांकडून आरोग्य यंत्रणेचा आढावा; घाबरू नका, काळजी घ्या, एकनाथ शिंदेंचे आवाहन
Corona JN.1 Variant: देशात आणि राज्यात सध्या जेएन-वन (JN.1) हा कोरोनाचा नवा व्हेरिएंट (Corona Variant) आढळून आला आहे. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज आरोग्य यंत्रणा तसेच जिल्हाधिकारी यांची बैठक घेतली. राज्यभरातील आरोग्य संस्थांचे स्ट्रक्चरल, इलेक्ट्रीक आणि फायर ऑडीट करण्यात यावे आणि त्याचबरोबर रुग्णालयांमध्ये विलगीकरण आणि ऑक्सिजन बेडस् यांची यंत्रणा सज्ज ठेवावी. नागरिकांनी […]
-
आयपीसी, सीआरपीसी अन् पुरावा कायदा बदलण्याचा मार्ग मोकळा, राज्यसभेत विधेयक मंजूर
Criminal Bills : लोकसभेनंतर राज्यसभेतही तीन नवीन फौजदारी (Criminal Bills) विधेयके मंजूर झाली आहे. यानंतर या तिन्ही विधेयकांचा कायद्यात रुपांतर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.गृहमंत्री अमित शहा (Amit Shaha) यांच्या उत्तरानंतर राज्यसभेने या विधेयकांना आवाजी मतदानाने मंजुरी दिली. राज्यसभेत ही विधेयके मंजूर झाली, त्यावेळी सभागृहातील विरोधी पक्षांतील 46 खासदारांना निलंबित करण्यात आलेले होते. भारतीय दंड […]
-
अग्निवीर योजना तिन्ही दलासाठी धक्का, माजी लष्करप्रमुख नरवणे यांच्या पुस्तकात मोठे गौप्यस्फोट
Agniveer Yojana : माजी लष्करप्रमुख जनरल एमएम नरवणे (MM Naravane) यांनी अग्निवीर योजनेबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. अग्निवीर योजना (Agniveer Yojana) ही भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलासाठी धक्का होती. त्यांचे ‘फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी’ (Four Stars of Destiny) हे आत्मचरित्रपर पुस्तक प्रकाशित झाले आहे. या पुस्तकात त्यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. 2020 मध्ये टूर […]
-
भाजप एकट्याने निवडणूक लढवणार, आरएसएससोबत गुप्त मंथन; जितेंद्र आव्हाडांचा गौप्यस्फोट
Jitendra Awhad : नागपूरमधील हिवाळी अधिवेशन (Winter Session 2023) संपल्यानंतर महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना लोकसभा निवडणुकांचे वेध लागले आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. नागपूरमध्ये भाजप-आरएसएस यांची एक वैचारिक बैठक झाली आणि त्या बैठकीत भाजपने स्वतंत्र निवडणूक लढवण्याचे फायनल झाले आहे. ज्यांना भाजपसोबत […]
-
‘सगेसोयरे’वरुन जरांगे पाटील आणि सरकारमध्ये मतभेद, बैठक निष्फळ
Manoj Jarange Patil : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची मंत्री गिरीष महाजन (Girish Mahajan), उदय सामंत, संदिपान भुमरे यांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. या बैठकीत सगेसोयरे या शब्दावरुन गाडी अडल्याचे मंत्री गिरीष महाजन यांनी सांगितले. मनोज जरांगे यांनी कुणबी (Maratha Reseravation) दाखले काढताना आईकडील वंशावंळ मुलांना लागू करावी, अशी मागणी केली होती. […]
-
IND Vs SA : तिसऱ्या वनडेत टीम इंडियात दोन बदल, पाहा प्लेइंग इलेव्हन
IND Vs SA : दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करामने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. टीम इंडिया प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरेल. दक्षिण आफ्रिकेने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. टीम इंडियाने दोन बदल केले आहेत. सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाड आज खेळत नाहीये. दुखापतीमुळे तो संघातून बाहेर गेला आहे. त्यांच्या जागी रजत पाटीदारला […]
-
लोकसभेतून आणखी 3 खासदार निलंबित, आतापर्यंत 146 खासदारांवर कारवाई
MPs Suspended : लोकसभा अध्यक्षांनी आणखी तीन खासदारांना (MPs Suspended) लोकसभेतून निलंबित केले आहे. सभागृहाचा अवमान केल्याप्रकरणी अध्यक्षांनी काँग्रेस खासदार नकुल नाथ, डीके सुरेश आणि दीपक बैज यांना चालू हिवाळी अधिवेशनातून निलंबित केले आहे. त्यामुळे निलंबित खासदारांची संख्या 146 झाली आहे. संसदेच्या सुरक्षेबाबत गृहमंत्री अमित शहा (Amit Shaha) यांच्या निवेदनाची मागणी विरोधी पक्षाच्या खासदारांनी केली […]










