World Cup 2023 : येत्या 5 ऑक्टोबरपासून एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकाचा (World Cup 2023) थरार रंगणार आहे. विश्वचषकावर आपल्या देशाचे नाव कोरण्यासाठी सर्वच संघांनी जोरदार तयारी केली असून, आता सामने सुरू झाल्यानंतर कोणता संघ मैदानात सरस ठरणार आणि कोणता कमजोर ठरणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र, त्यापूर्वी विश्वचषकात सहभागी होणाऱ्या प्रमुख संघांची ताकद आणि कमजोरी […]
पुणे : यंदाच्या वर्षी दगडुशेठ गणपती विसर्जन मिरवणूक वेळेत संपल्यानंतरदेखील पुण्यातली गणपती विसर्जन मिरवणूक संपण्यास 30 तास 20 मिनिटांचा कालावधी लागला आहे. काल (दि. 28) रोजी सकाळी दहाच्या सुमारास सुरू झालेली पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुक आज (दि. 29) रोजी दुपारी 4 वाजून 40 मिनिटांनी संपली आहे. म्हणजेच यंदाच्या वर्षी ही मिरणूक 30 तास 20 मिनिटे […]
Rohit Pawar : राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या बारामती ॲग्रो कंपनीला (Baramati Agro Company) महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डाने (Maharashtra Pollution Control Board) नोटीस पाठवली होती. ही नोटीस मध्यरात्री दोनच्या सुमारास आल्याने मोठी खळबळ माजली होती. या नोटीसमध्ये 72 तासांत रोहित पवार यांना दोन प्लांट बंद करण्याचे निर्देश देण्यात आले होते. […]
Blast In Balochistan : बलुचिस्तानमध्ये ईद-ए-मिलादच्या मिरवणुकीत मोठा स्फोट झाला असून, स्फोटात ठार झालेल्यांमध्ये एका पोलीस उपअधीक्षकासह (DSP) 52 हून जण ठार झाले आहेत, तर 130 हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. बलुचिस्तानमधील मस्तुंग जिल्ह्यातील अल-फलाह मशिदीजवळ ईद मिलाद-उल-नबीच्या मिरवणुकीला लक्ष्य करून स्फोट घडवण्यात आला आहे. या भीषण घटनेत जखमी झालेल्या नागरिकांवर जवळील रूग्णालयामध्ये उपचार सुरू […]
नवी दिल्ली : नोटबंदीच्या मोठ्या धाडसी निर्णयानंतर आरबीआयने (RBI) दोन हजारांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला. नागरिकांकडे असणाऱ्या दोन हजारांच्या नोटा परत करण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंती मुदत दिली होती. मात्र, देशात अनेक नागरिक असे आहेत ज्यांना काही कारणास्तव अद्यपर्यंत त्यांच्याकडील दोन हजारांच्या नोटा बदलणे शक्य झालेले नाही. अशा नागरिकांसाठी आरबीआय लवकर मोठी घोषणा करण्याची शक्यता […]
पुणे : गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या गणपती उत्सावाची सांगता काल (दि. 28) गणपती विसर्जनाने झाली. मात्र, दरवर्षीप्रमाणे पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणूक यंदाही चर्चेचा विषय ठरली. यामागे कारण ठरले ते दगडुशेठ गणपतीचे (Dagdushet Ganpati) ठरलेल्या वेळेत झालेले विसर्जन. परंतु, दगडुशेठ मंडळाच्या गणपतीचे विसर्जन वेळेत होऊनही शहरातील मंडई, बाबू गेनू, श्रीमंत भाऊ रंगारी यासह अन्य मंडळांच्या […]
मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणजे राजकारणातील शक्ती कपूर असल्याची बोचरी टीका भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केली आहे. राणेंच्या या टीकेनंतर राणे आणि राऊतांमधील वाद अधिक शिगेला जाण्याची शक्यता आहे. राणेंच्या या टीकेला आता राऊत काय उत्तर देणारे हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. राणेंनी यावेळी सामनामध्ये प्रकाशित लेखावर […]
मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी भाजपचे माजी खासदार संजय काकडे (Sanjay Kakade) यांच्या घरी जाऊन बाप्पांचे दर्शन घेतले होते. त्यानंतर आता काकडे यांनी फडणवीसांचे मुंबई येथील शासकीय निवास्थान असलेल्या सागर बंगल्यावर जाऊन बाप्पांचे दर्शन घेत साकडे घातले आहे. महाराष्ट्रातील जनतेला सुखी आणि समृद्ध […]
Nepal Kushal Malla Fastest Century In Asian Games : आशियाई गेम्समध्ये नेपाळने मंगोलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात अनेक विक्रम मोडीत काढले. नेपाळ संघाने अवघ्या 120 चेंडूत 314 धावा केल्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच एखाद्या संघाने टी-20 सामन्यात 300 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) 2017 मध्ये इंदूरच्या होळकर स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या टी-20 […]
मुंबई : आगामी वर्षभरात पत्रकारांनी आपल्या विरोधात एकही बातमी छापू नये, यासाठी त्यांना चहा प्यायला घेऊन जा, ढाब्यावर न्या, चहा प्यायला बोलवायचे म्हणजे समजलेच असेल तुम्हाला, असा सल्ला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी दिला होता. त्यांच्या या विधानानंतर विविध स्तरातून नाराजी व्यक्त केली जात असून, आता बावनकुळेंनी दिलेले ढाब्यावरचे निमंत्रण सामाजिक कार्यकर्ते हेरंब […]