पुणे : खासदार अमोल कोल्हे हे नाराज नाहीत ते सतत आमच्याशी चर्चा करत असतात संपर्क साधत असतात. तसेच शिरूर मधून 2024 ला लोकसभेचा राष्ट्रवादीचा उमेदवार अमोल कोल्हेचं असतील का नाही. हे मी सांगू शकत नाही तो निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील. तो अधिकार मला नाही. शिरूर मधून 2024 ला लोकसभेचा राष्ट्रवादीचा उमेदवार अमोल कोल्हेचं असतील का? असा […]
मुंबई : महाराष्ट्र फाउंडेशनचे संस्थापक सुनील देशमुख यांचं अमेरिकेत निधन झालं. अमेरिकेत राहुन त्यांनी मराठी संस्कृती फुलवण्यात मोठं योगदान दिलं. सत्तरच्या दशकात अमेरिकेत जाणाऱ्या तरूणांमध्ये त्यांचं नाव प्रामुख्याने घेतलं जात. सांगलीतून मुंबईत आणि नंतर ते अमेरिकेतील फ्लोरिडा येथे गेले. त्यांच्या निधनाने मराठी साहित्य व महाराष्ट्रातील सामाजिक चळवळीची मोठी झालेली हानी आहे. 1970 च्या दरम्यान जे […]
पाथर्डी : ‘आम्ही लोकांच्या हिताच्या भूमिकेतून उपोषण केले. आंदोलनकर्ते उपोषणस्थळी जेवण करतानाचे फोटो आणि व्हिडिओ तुमच्याकडे आहेत. ते काय खिशात ठेवायला आहेत का? तुमच्याकडे असतील तर ते लाईव्ह करा. आम्ही खऱ्या चार-पाच उपोषणकर्त्यांनी त्या ठिकाणी काही खातानाचे कुठे फोटो आला, तर हा निलेश लंके आत्ता या क्षणी विधानसभेचा राजीनामा देईल. असे आव्हान आमदार निलेश लंके […]
मुंबई :’संभाजीराजांना ‘धर्मवीर’ म्हणून अवघा महाराष्ट्र गेली 105 वर्षे ओळखतो आहे. कागदपत्रे साक्ष देतात. ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ हे मार्केटेबल टायटल अमोल कोल्हे यांनी आपल्या सिरीयलसाठी वापरले इतकेच.’ असं स्पष्टीकरण ज्येष्ठ लेखक विश्वास पाटील यांनी दिलं. त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टद्वारे हे स्पष्टीकरण दिलं. नागपुरात विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशना दरम्यान विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर […]
वेग आणि स्पर्धेची अनुभूती देणारा ‘ग्रॅन टुरिस्मो’ मुंबई : ‘ग्रॅन टुरिस्मो’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. जगभरात मोठ्या प्रमाणात खेळल्या गेलेल्या ‘ग्रॅन टुरिस्मो’ नावाच्या व्हिडीओ गेम सिरिजवर आधारित आहे. किशोर वयात ‘ग्रॅन टुरिस्मो’ हा व्हिडीओ गेम खेळणाऱ्या जॅन मार्डनबरो या मुलाच्या आयुष्यावर आधारित आहे. थोडक्यात ‘ग्रॅन टुरिस्मो’ हा चित्रपट सत्य कथेवर आधारित […]
मुंबई : ‘हे सीएम नाहीत व्हाईसरॉय ऑफ महाराष्ट्र आहेत. व्हाईसरॉयच्या हातात कायदा होता. तो कोणाचाही ऐकत नव्हता. तसे हे व्हाईसरॉय आहेत. नवी मुंबईच्या निवडणुका येतील, नशीब पोलीस मतदान करत नाहीत, एवढेच राहिलाय आता. नाही तर सांगतील जाऊन तुम्ही बटन दाबून या आपण बघू. असं ही व्हयचं, असं कधी होतं का ? इतके वर्ष स्थानिक स्वराज्य […]
मुंबई : अखेर महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी पुकारलेला संप मागे घेतला आहे. आज वीज कर्मचारी आणि उपमुख्यमंत्री-उर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक पार पडली, या बैठकीत वीज कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा निघाला आहे. त्यानंतर महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी संप मागे घेतला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. आज दुपारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली. […]
मुंबई : पोलिसांना विचारा ना की, ते कोणत्या कायद्यांतर्गत ते उर्फी जावेदवर कारवाई करणार आहेत. आम्हालाही उर्फीचे कपडे आवडत नाहीत. पण ती एक अभिनेत्री आहे. एक अभिनेत्री म्हणून ती जे काही स्टंट करते त्यावर कायद्याने तो गुन्हा नाही. तुम्ही म्हणाल तो व्याभिचार ठरणार नाही. कायद्यात तशी तरतुद असावी. तुम्ही तीला कपडे जास्त घाल म्हणून सांगितलं […]
पुणे : महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव असलेले थोर साहित्यिक ग. दि. माडगूळकर यांच्या स्मारकाचे काम एका वर्षात पूर्ण करावे, त्यासाठी येत्या आठवड्यात निविदा प्रकिया सुरु करावी, असे निर्देश राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकात पाटील यांनी दिले. पाटील यांनी ग.दि. माडगळूकर यांच्या नियोजित स्मारकाला भेट देवून अधिकाऱ्यांकडून स्मारकाच्या कामाबाबत माहिती घेतली. यावेळी पुणे […]
मुंबई : विश्व मराठी संमेलन पहिल्यांदाच आयोजित करण्यात आले. जगभरातील मराठी लोकांना एकत्र आणण्यासाठी हे संमेलन आयोजित करण्यात आले. पुढील वर्षी या संमेलनाचं मोठ्या प्रमाणात आयोजन केले जाईल. अशी ग्वाही या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. यावेळी त्यांनी मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर यांचे हे संमेलन आयोजित केल्याबद्दल आभार मानले आहेत. यावेळी मुख्यमंत्री […]