Chinmay Kelkar Victim Of Fraud Call : लेखक, अभिनेता अन् दिग्दर्शक चिन्मय केळकर (Chinmay Kelkar) संदर्भात एक मोठी बातमी समोर आलीय. २१ ऑक्टोबर रोजी चिन्मय केळकरची मोठी फसवणूक होता होता राहिली. यासंदर्भात स्वत: चिन्मयने त्याच्या फेसबुक अकाउंटवर पोस्ट शेअर करत माहिती दिलीय. सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये चिन्मय म्हणाला की, मला २१ तारखेला एक कॉल आला होता. तो फसवणुकीचा कॉल (Fraud Call) होता. परंतु हे माझ्या उशिरा लक्षात आलं. त्यानंतर घडलेली संपूर्ण घटना चिन्मयने फेसबुक पोस्टमध्ये सांगितली आहे, ती आपण जाणून घेवू या.
मोठी बातमी : अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला मुंबई HC कडून जामीन; जन्मठेपेलाही स्थगिती
चिन्मय म्हणतोय की, तो काल ‘Virtual Arrest’ या नव्यानं तयार केल्या गेलेल्या फसवणुकीच्या कटाचा बळी ठरता ठरता वाचलाय. सकाळी कामामध्ये व्यस्त असताना एक कॉल आला. नंबर अपरिचित होता, तो कॉल सेंटर किंवा भलत्या राज्यातला आहे हे ओळखू येण्यासारखा नव्हता. कामात गर्क असल्यामुळे त्याने तो कॉल (Cyber Crime) घेतला. समोरून बोलणारा आवाज एका स्त्रीचा होता. ती सायबर क्राइम ब्रॅंचमधून आलेला संदेश चिन्मयपर्यंत पोहोचवत होती. वैयक्तिक दुवे वापरून काही गैरव्यवहार झालेले असण्याची शक्यता ती नोंदवत होती. त्या विरोधात सायबर गुन्हे विभागाकडे गुन्हा नोंदवला पाहिजे असं रोखठॊक आवाहन करत होती. तसं न केल्यास त्या कथित गैरव्यवहारात सामील असल्याचं गृहित धरून कायदेशीर कारवाई केली जाईल. अशी धमकी देखील देत होती.
डॉ. अजित रानडे यांना न्यायालयाचा मोठा दिलासा; कुलगुरू पदावरून बडतर्फ करण्याचा आदेश घेतला मागे
डार्कवेब बद्दल अर्धवट माहिती घेतल्यामुळे चिन्मयला जे सांगितलं जात होतं, त्यात तथ्य वाटलं. कॉलमध्ये सांगितल्याप्रमाणे पुढे संभाषण चालू ठेवून सायबर गुन्हे विभागाकडे तक्रार नोंदवण्यासाठी 9 हा आकडा चिन्मयने टाईप केला. कॉल एका अधिकार्याकडे नेण्यात आल्याचं लक्षात आलं. त्या अधिकार्यानं आपलं नाव मोहन गुप्ता असं सांगितलं. त्यानं पुन्हा एकदा चिन्मय कुठल्या अडचणीच्या आणि धोकादायक परिस्थितीत अडकलो असण्याची शक्यता असल्याचा पुनरुच्चार केला. डार्क वेबच्या विविध गुन्हेगारी हालचाली आणि कृतींमध्ये माझ्या वैयक्तिक आणि खाजगी माहिती आणि दस्ताऐवजांचा उपयोग माझ्याही नकळत केला गेला असल्याची माझी खात्री करून देण्यात तो यशस्वी ठरला.
त्याने काही प्रश्न चिन्मयला विचारले. ज्यात इंटरनेटचा वापर, बॅंकेशी व्यवहार करताना ओ.टी.पी. किंवा पिन शेअर केलाय, पॉर्न साइट्चा वापर, अॅप यांचा वापर केलाय का? याचा समावेश होता. उत्तरांनंतर त्यांनी चिन्मयला ज्या कुणामुळे किंवा कशामुळे वैयक्तिक माहिती चोरून गैर वापरली गेली आहे त्या विरूद्ध रीतसर, औपचारिक तक्रार नोंदवण्याकरता कुठल्या पायर्या, कुठल्या क्रमानं पाळायच्या ते सांगायला सुरूवात केली. त्याचवेळी चिन्मयने प्रामाणिकपणे सगळी माहिती न लपवता दिली याबद्दल माझं कौतुक केलं. मग नोंदवणार असलेल्या अधिकृत तक्रारीचा दस्त क्रमांक (F.I.R. no) पुरवला. आणखीही काही क्रमांक नोंदवून घ्यायला सांगितले. तक्रारीचं शीर्षकही मला लिहून घ्यायला लावलं. आणि मग नंतर वरिष्ठ अधिकार्यासमोर जबाब द्यायचं असल्याचं सांगितलं. या सगळ्यावरून तो कॉल सायबर क्राइम ब्रॅंचकडून आलेला अधिकृत असल्याची चिन्मयची खात्री पटली होती.
वरिष्ठ अधिकाऱ्याने त्यांना हैद्राबादमध्ये येवून तक्रार नोंदवण्याविषयी विचारलं. परंतु ते शक्य नसल्यामुळे ऑनलाईन तक्रार नोंदवण्यास सांगितलं. सोबतच काही सूचना दिल्या. त्यानंतर एक व्हिडिओ कॉल आला ज्यावर हैदराबाद सायबर क्राइम असं लिहिलेलं होतं. त्या अधिकाऱ्याने देखील नजीकच्या काळात हॉटेल, पब, रेस्टॉरंट, रिसॉर्ट किंवा प्रवास करताना कुठेही ओ.टी.पी., आधार, क्रेडिट किंवा डेबिट चा सी.व्ही.व्ही. कोड असं काही वापरलं आहे का? असं विचारलं. त्यानंतर वार्षिक मिळकतीबाबत विचारलं, घाईत असल्यामुळे चिन्मयने आधारकार्ड क्रमांक देवून टाकला होता. त्यानंतर हे आधारकार्ड चिन्मय केळकर या नावाच्या व्यक्तीचं आहे. तो मनी लॉन्डरिंग आणि पैशाच्या गैरव्यवहारात बॅंकेला फसवल्याचा कटात सामील असल्याचं रेकॉर्ड आहे. तुम्ही एका सातशे करोडच्या घपल्यात अडकलेले आहात. तुमचं नाव ह्या गुन्ह्याशी संशयित म्हणून जोडलं गेलेलं असल्याचं चिन्मयला सांगण्यात आलं होतं.
त्यानंतर तो दबाव टाकून चिन्मयला कोणत्या बॅंकेत खातं आहे, हे विचारू लागला. तेव्हा त्याच्या आवाजावरून आपली फसवणूक झाली, असल्याचं चिन्मयच्या लक्षात आलं. त्याने फोन कट केला. यादरम्यानचं संभाषण चिन्मयच्या आईने ऐकलं होतं, तेव्हा तिने फोन करून पोलिसांना बोलावलं होतं. त्यानंतर कोणतीही विश्वासार्ह माहिती आपण दिली नसल्याची खात्री पोलिसांनी केली. घडलेल्या प्रकारानंतर चिन्मयने अधिक सतर्क, अधिक सजग आणि अधिक विवेकानं आणि सावधपणे इंटरनेटचा वापर आणि अशा कॉल्सना बळी न पडणं हे करायला हवं, असं आवाहन केलं.