पक्षप्रवेश करताच अर्चना पाटलांना धाराशिवची उमेदवारी जाहीर, ओमराजे निंबाळकरांना देणार ‘फाईट’

  • Written By: Last Updated:
पक्षप्रवेश करताच अर्चना पाटलांना धाराशिवची उमेदवारी जाहीर, ओमराजे निंबाळकरांना देणार ‘फाईट’

Dharashiv’s candidature announced to Archana Patil : भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील (Rana Jagjit Singh Patil) यांच्या पत्नी अर्चना पाटील (Archana Patil) यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. अर्चना पाटील यांचा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात पार पडला. त्यावेळी आयोजित पत्रकार अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी (Sunil Tatkare) अर्चना पाटील यांना धाराशिव लोकसभा मतदारसंघातून महायुतीची उमेदवारी जाहीर केली.

Government Schemes : मधुमक्षिका पालन योजनेचा लाभ कोणाला अन् कसा घेता येईल? 

अर्चना पाटील या ‘घड्याळ’ निवडणूक चिन्हावरून निवडणूक लढविणार असल्याचे चर्चा सुरू होती. अखेर अर्चना पाटलांना आज दुपारी ३ वाजता अधिकृतपणे राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी बोलतांना तटकरेंनी म्हणाले की, महायुतीच्या जागावाटपात धाराशिवची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्षा म्हणून राष्ट्रवादीच्या वतीने महायुतीच्या उमेदवार म्हणून अर्चना पाटील या आमच्या लोकसभेच्या उमेदवारी आहे. महायुतीच्या उमेदवाराचा एकसंघपणे घोषणा ही पहिल्यांदाच होत आहे. याआधी प्रत्येक पक्षाने आपले उमेदवार जाहीर केले. मात्र धाराशिवच्या बाबतीत वेगळेच चित्र पाहायला मिळते, असं तटकरे म्हणाले.

पक्षप्रवेश करताच अर्चना पाटलांना धाराशिवची उमेदवारी जाहीर, तटकरेंनी केली घोषणा 

पुढं बोलतांन ते म्हणाले की, धाराशिव मतदारसंघातील भाजपचे आमदार, शिवसेनेचे आमदार, शिक्षक पदवीधर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार एकत्र येऊन राष्ट्रवादीच्या महायुतीच्या उमेदवारांची घोषणा करणार आहे. धाराशिवमध्ये अर्चना पाटील मोठ्या फरकाने विजयी होतील, असं तटकरे म्हणाले.

दरम्यान, धाराशिवमध्ये महाविकास आघाडीने विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकरांना उमदेवारी दिली आहे. आता महायुतीने अर्चना पाटील यांच्यारुपाने उमेदवार दिला. त्यामुळं धाराशिमध्ये ओमराजे निंबाळकर आणि अर्चना पाटील यांच्यात लढत होणार आहे.

कोण आहेत अर्चना पाटील?

अर्चना पाटील या धाराशिव जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा होत्या. मात्र, सध्या त्या कोणत्याही राजकीय पदावर नाही. लेडीज क्लब या धाराशिव जिल्हा आणि परिसरातील महिलांसाठी काम करणाऱ्या संघटनेच्या त्या अध्यक्षा आहेत. तुळजापूरचे भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या त्या पत्नी आहेत. लोकसभेच्या माध्यमातून त्या पुन्हा एकदा राजकारणात सक्रीय झाल्या आहेत

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज