तुम्ही चाट पडाल! मोदींनीच पुतीनला फोन लावून रशिया-युक्रेन युध्द…; अजितदादांकडून मोदीचं कौतुक

तुम्ही चाट पडाल! मोदींनीच पुतीनला फोन लावून रशिया-युक्रेन युध्द…; अजितदादांकडून मोदीचं कौतुक

Ajit Pawar Satara Speech : साताऱ्यातील सभेत बोलतांना अजित पवारांनी (Ajit Pawar) पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केलं. मोदींवर दहा वर्षात कोणाही शिंतोड उडवले नाही. भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेनमधून परत आणण्यसााठी नरेंद्र मोदींनीच (Narendra Modi) पुतीन यांना फोन करून रशिया – युक्रेन युध्द थांबवलं होतं, अशा शब्दात अजित पवारांनी मोदींचं कौतुक केलं.

Prerna Arora: …म्हणून अभिनेत्री प्रेरणा अरोरा पहिली भारतीय निर्माती बनली 

मी चव्हाण साहेबांच्या मार्गाने…
महायुतीचे साताऱ्याचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठी आज महायुतीची आज साताऱ्यात सभा झाली. या सभेला संबोधित करतांना अजित पवार म्हणाले, आज मी जो राजकीय निर्णय घेतलेला आहे, तो सत्तेसाठी घेतला नाही. मी सत्तेसाठी हपापलेला नाही. मी चव्हाण साहेबांची अनेक पुस्तके वाचली आहेत. त्यांच्यावरही काही राजकीय संकटं आली होती. चढ-उतार आले होते. याचे तुम्ही आम्ही साक्षीदार आहोत. मात्र त्यांनी पुस्तकात लिहिलं की, बहुजन समाजाला मदत करायची असेल तर सरकारमध्ये जाऊनच करावी लागते. मी पण, चव्हाण साहेबांचा विचार आणि त्यांनी दाखवलेला रस्त्याने पुढं जात आहे, असं अजित पवार म्हणाले.

राहुल गांधींवर बोफोर्सचा आरोप, भरसभेत अजितदादांचं विधान, चूक सावरत म्हणाले, ‘आता बापाचं…’ 

स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणीही मी जहिरनामामध्ये केली आहे. थोडा उशीर झाला, पण अनेक महान व्यक्तींना त्यांच्या निधनानंतर पुरस्कार मिळाले, असेही अजित पवार म्हणाले आहेत.

मोदींनीच युद्ध थांबवलं
अजित पवार म्हणाले, पंतप्रधान मोदी यांच्या 10 वर्षांच्या कार्यकाळात कोणीही त्यांच्यावर शिंतोडे उडवले नाहीत. पाकिस्तान आपल्यावर कुरघोड्या करायचं. पुलवामाला असा दणका दिला की, पुन्हा पाकिस्तानने आपल्याकडे पाहिलं नाही आमची भारतीय मुलं-मुली युक्रेनला शिकायला गेली होती, तेव्हा रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाले. आमची मुले तिथे शिकायला गेल्याचे आम्हाला फोन येऊ लागले.

आम्ही मोदींशी संपर्क साधल्यावर ते म्हणाले, तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला चाट पडाल पण युक्रेनच युद्ध थांबवण्यासाठी मोदींनी पुतीन यांना फोन केला आणि सांगितलं की, भारतातीत मुलं तिथं आहे. त्यामुळे तेवढ्या काळापुरतं युद्ध थांबवा. त्यामुळे युद्ध थांबले आणि विशेष विमान पाठवून सगळ्यांना सगळ्यांना सुरक्षित त्यांच्या जागी पोहोचवलं. हे येड्या गबाळ्यचां काम नाही, असं असंही अजित पवार म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube