संतोष देशमुख हत्येच्या दोन महिन्यांतर नवा व्हिडिओ; स्कॉर्पिओचा ‘तो’ धक्कादायक CCTV समोर

  • Written By: Published:
संतोष देशमुख हत्येच्या दोन महिन्यांतर नवा व्हिडिओ; स्कॉर्पिओचा ‘तो’ धक्कादायक CCTV समोर

Santosh Deshmukh Murder Case : संतोष देशमुख यांचं 9 डिसेंबर 2024 रोजी सरपंच अपहरण करून हत्या करण्यात आली. ही हत्या केल्यानंतर देशमुख यांचा मृतदेह केज परिसरातील शिवारात फेकून (Santosh Deshmukh) आरोपींनी धाराशिव जिल्ह्याकडे पलायन केलं. या प्रकरणात नवीन सीसीटीव्ही समोर आला आहे.या सीसीटीव्हीतील सगळा प्रकार धक्कादायक असल्याच समोर आलं आहे.

बीड सरपंच देशमुख हत्या प्रकरणात नवा सीसीटीव्ही समोर ब्लॅक स्कॉर्पिओ गाडी आहे. त्याच ठिकाणी स्कॉर्पिओ लावून सहा आरोपी पसार झाल्याचा धक्कादायक प्रकार कॅमेऱ्यात कैद झालं आहे. आरोपीत कृष्णा आंधळेचा देखील समावेश आहे. या व्हिडीओनंतर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला एक नव वळण मिळालं आहे.

कोणीही असू दे, संतोष देशमुखांच्या प्रत्येक मारेकऱ्यावर कारवाई होणार! CM फडणवीसांचा बीडमध्ये जाऊन इशारा

धाराशिव जिल्ह्यातील वाशी शहरातल्या पारा चौकात काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीत आरोपी पोहोचतात. याच ठिकाणी गाडी लावून आरोपींनी पलायन केले. घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला असून यात सहा आरोपी पळून जातायत. विशेष बाब म्हणजे यात कृष्णा आंधळेचा देखील समावेश आहे.

वाशी परिसरात असणाऱ्या साखर कारखान्याच्या दिशेने हे सहा आरोपी जंगलाच्या दिशेने पळून गेले. यावेळी चार किलोमीटरचे अंतर पाई चालले असल्याची माहिती देखील प्राप्त झाली आहे. दरम्यान या सीसीटीव्हीच्या आधारे तपास यंत्रणा तपास करत असून या आधारे कृष्णा आंधळेपर्यंत पोहोचता येईल का? हा प्रश्न मात्र कायम आहे. तर घटनेनंतर तपास यंत्रणेने ही ब्लॅक कलरची स्कॉर्पिओ गाडी जप्त केली आहे.

310 शस्त्र परवाने रद्द,127 जणांवर कारवाई

बीड जिल्ह्यात आत्तापर्यंत एकूण 310 शस्त्र परवाने रद्द करण्यात आले आहे. ज्यात पोलिसांनी प्रस्ताव पाठवलेल्या आणखी 127 जणांचे शास्त्र प्रमाणे रद्द निलंबित करण्यात आले आहेत. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर अवैध शस्त्र परवानाचा मुद्दा समोर आला होता. त्यानंतर प्रशासनाने ही कारवाई केली आहे

जिल्ह्यात 1281 जणांकडे शस्त्र परवाना होता. तत्कालीन पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी पदभार घेताच, ज्या लोकांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. अशा 232 जणांची यादी जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्याकडे पाठवली. त्यानंतर सरपंच देशमुख हत्या प्रकरण समोर आले आणि शस्त्रपरवाण्याचा मुद्दा चर्चेत आला

जिल्हा प्रशासनाने गंभीर दखल घेत आतापर्यंत 310 शस्त्र प्रमाणे रद्द केले आहेत. तर 127 जणांवर कारवाई केलीय. यात आणखी प्रस्ताव पाठविण्यात आले आहे. पोलीस अधीक्षकांनी आणखी 5 प्रस्ताव पाठवले असून 19 जणांच्या अर्जावर मात्र आक्षेप नोंदवला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube