स्वतःची भाकरी महाराष्ट्रातच भाजली! खासदार दुबेंचं मुंबई कनेक्शन, अलिशान घर अन् प्रतिष्ठेची नोकरी…

स्वतःची भाकरी महाराष्ट्रातच भाजली! खासदार दुबेंचं मुंबई कनेक्शन, अलिशान घर अन् प्रतिष्ठेची नोकरी…

 BJP MP Nishikant Debye Flat In Khar Worked In Mumbai : भाजप (BJP) खासदार निशिकांत दुबे यांनी (Nishikant Dubye) महाराष्ट्राला नाकारलं, परंतु मुंबईतील अलिशान राहणीमान उपभोगलं. मराठी जनतेवर सातत्याने खासदार दुबे वार करीत आहेत. दुबेंनी जवळपास 16 वर्षे महाराष्ट्रातच नोकरी केल्याचं समोर आलंय. भारतीय जनता पक्षाचे झारखंडमधील खासदार निशिकांत दुबे यांनी अलीकडेच महाराष्ट्राबाबत (Marathi) दिलेली विधाने वादाच्या भोवऱ्यात सापडली आहेत.

 खासदार दुबेंची भूमिका दुहेरी

महाराष्ट्रात स्वतःचे काहीही नाही, हे राज्य इतरांच्या जीवावर जगतं, असं वक्तव्य करत त्यांनी राज्याचा अवमान केल्याची टीका होऊ लागली आहे. मात्र, याच महाराष्ट्रात स्वतःचा फ्लॅट असलेल्या आणि जवळपास 16 वर्षे मुंबईत नोकरी केलेल्या दुबे यांच्यावर आता दुहेरी भूमिकेचा आरोप होतोय.

मुलीच्या औषधासाठीही पैसे नव्हते; कर्जबाजारी व्यावसायिकाने संपवलं जीवन, फेसबुकवर लाईव्ह करत…

मुंबईच्या पश्चिम उपनगरातील खार परिसरातील ‘झुलेलाल अपार्टमेंट’मध्ये दुबे यांचा 1680 चौरस फुटाचा आलिशान फ्लॅट आहे. सदर फ्लॅट क्रमांक 404 असून, तेथील रहिवाशांच्या माहितीनुसार, गेल्या 10-12 वर्षांपासून त्या घरात एकच भाडेकरू राहतो आहे. दुबे यांनी स्वतःच्या शपथपत्रात या फ्लॅटचा उल्लेख 2009 मध्ये केला होता. त्यावेळी त्याची किंमत सुमारे 1 कोटी 60 लाख रुपये असल्याचं त्यांनी नमूद केलं होतं.

 कंपनीत उच्च पदावर काम 

विशेष म्हणजे, दुबे यांनी 1993 ते 2009 या काळात मुंबईतील एका नामांकित स्टील व ऊर्जा क्षेत्रातील कंपनीत उच्च पदावर काम केलं. म्हणजे, जेव्हा महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाबद्दल ते टीका करत आहेत, तेव्हाच ते स्वतः त्याच महाराष्ट्रात उभ्या असलेल्या उद्योगातून लाभ घेत होते, ही बाब आता उघड झाली आहे.

भाजपाचं ठरलं! पुण्यात अजितदादांना शह? शिलेदारांना खास मिशन अन् इनकमिंगही..

दुबे यांचं हे वादग्रस्त वक्तव्य आणि त्यांच्या भूतकाळातील महाराष्ट्राशी असलेली घनिष्ठ नाळ पाहता, सोशल मीडियावर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे. अनेकांनी त्यांच्या वक्तव्याला कृतघ्नतेचं प्रतीक म्हटलंय. ज्या महाराष्ट्राने तुम्हाला पोटभर अन्न आणि प्रतिष्ठा दिली, त्याच राज्याला कमी लेखणं दुर्दैवी आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत.

 खासदार दुबेंना भाकरी महाराष्ट्रानेच दिली

– खासदार निशिकांत दुबे यांचं घर महाराष्ट्रातच
– 1680 स्क्वे. फूटचा फ्लॅट (मुंबईतील खार भागात)
– 2009 च्या शपथपत्रात 1.60 कोटींच्या फ्लॅटचा उल्लेख
– फ्लॅटचा क्रमांक 404, क्षेत्रफळ 1680 चौरस फूट
– मुंबईत 16 वर्ष नोकरी
– स्टील आणि ऊर्जा क्षेत्रातील कंपनीत मोठं पद

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube