शेअर बाजारात हाहाकार! गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी पाण्यात; नेमकं काय घडलं?

शेअर बाजारात हाहाकार! गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी पाण्यात; नेमकं काय घडलं?

Share Market Down : अमेरिकेतील शेअर बाजारात घडणाऱ्या घडामोडींचा परिणाम भारतातील शेअर बाजारावर (Share Market Down) झाला आहे. आज बुधवारी सकाळच्या सत्रात सुरुवातीलाच शेअर बाजार गडगडला. जगभरात विक्रीचा दबाव वाढला याला भारताचा शेअर बाजारही अपवाद राहिला नाही. मंगळवारी अमेरिकन बाजारात खळबळ उडाली. ज्यामुळे मंदीचं संकट अधिक गडद होताना दिसत आहे. डाऊ जोन्सपासून नॅसडॅकपर्यंत घसरण नोंदवण्यात आली. याचा प्रतिकूल परिणाम गिफ्ट निफ्टीवर दिसून आला. बुधवारी सेन्सेक्स आणि निफ्टीत दबाव दिसून आला. या दिवशीचा व्यवहार सुरी होताच शेअर बाजार कोसळला.

शेअर बाजारातील या परिस्थितीमुळे सुरुवातीच्या सत्रात निफ्टी आयटी, पीएसयू बँक आणि मेटल एक टक्क्यांनी घसरले. ओएनजीसी, विप्रो, एलटीआएम या कंपन्यांचे शेअर्स दोन टक्क्यांनी खाली आले. या परिस्थितीत गुंतवणूकदारांचे तब्बल 3.1 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. BSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप 3.1 लाख कोटी रुपयांनी घसरून 462.4 लाख कोटींवर आले. इन्फोसिस, ICICI बँक, लार्सन अँड टुब्रो, टिसीएस, भारती एअरटेलची या घसरणीत मोठे भूमिका राहिली. JSW स्टील आणि टाटा स्टीलचे शेअर्सही 1.5 टक्क्यांनी घसरले.

शेअर बाजाराची सुरुवात कासव गतीने; निफ्टी 25,000च्या जवळ, सरकारी कंपन्यांचे शेअर्स तेजीत?

शेअर बाजारात काय घडलं?

दोन दिवसांपूर्वी यूएस मॅन्यूफॅक्चरिंगची आकडेवारी जाहीर करण्यात आली. यामध्ये ऑगस्ट महिन्यात घट झाल्याचे दिसून आले. त्यामुळे अमेरिकेत मंदीची भीती निर्माण झाली आहे. याच भीतीमुळे अमेरिकेच्या शेअर बाजारात मोठी घसरण झाली. आयटी कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात प्रॉफिट बुकिंग केली. त्यामुळे जगभरात विक्रीचा दबाव दिसून आला. शेअर बाजार गडगडण्याचं हे एक कारण असल्याचं सांगितलं जात आहे. आता येत्या 17-18 सप्टेंबर रोजी यूएस फेड रिजर्व्हची बैठक होणार आहे. या बैठकीकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागून राहिले आहे. या बैठकीत व्याजदर कपातीचा निर्णय घेतला जाऊ शकतो असे सांगितले जात आहे. त्यामुळे या बैठकीत खरंच असा निर्णय घेतला जाणार का याची उत्सुकता आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube