एक ठाकरे भाड्याने घेतला, मात्र विजय इंडिया आघाडीचाच; मोदीजी शपधविधीला या

एक ठाकरे भाड्याने घेतला, मात्र विजय इंडिया आघाडीचाच; मोदीजी शपधविधीला या

Uddhav Thackeray criticizes PM Modi : शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंनी मुंबईत अनिल देसाई यांच्या प्रचार सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दलच्या वक्तव्याचा दाखला देत हे संघावर बंदी घालतील असा थेट आरोपच भाजपवर केला आहे. तसंच, 16 व वर्ष धोक्याचं तस संघासाठी 100 व वर्ष धोक्याचं होतय की काय असंही ठाकरे यावेळी म्हणाले.

 

आम्ही देशभक्त आहोत मोदी भक्त नाही! उद्धव ठाकरेंचा विरोधकांवर जोरदार प्रहार

फक्त भाडोत्री लोक

भारतीय जनता पक्ष नसून हा भाकड जनता पक्ष आहे. हा पक्ष भाडोत्री आहे असा घणाघातही ठाकरे यांनी यावेळी केला. आज यांच्या नावाने सभेसाठी ग्रांऊंडही बूक होत नाही. मग यांच काय आहे असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. तसंच, या भाजपची 4 जून नंतर काय हालात होईल याची चिंता करा. कारण तुमच्या सभेला फक्त भाडोत्री लोक असतात असा थेट आरोप ठाकरेंनी केला.

 

भाड्याने घेतले

आपलेच गद्दार पोरं कडेवर घेऊन हे भाजपवाले फिरत आहेत. आपण देसाईंच्या रुपात चारित्र्यवान उमेदवार दिला आहे. तर, समोरचा उमेदवार चारित्र्यहीन आहे. मग तुम्हाला कोण पाहिजे असा प्रश्नही ठाकरेंनी उपस्थित केला. तसंच, ठाकरे नावासाठी कुणीतरी पाहिजे म्हणून एक घेतला भाड्याने असं म्हणत उद्धव ठाकरेंनी यावेळी नाव न घेता राज ठाकरेंवर टीका केली.

 

घे सुपारी, उठ दुपारी

उद्धव ठाकरे यांनी एक ठाकरे भाड्याने घेतलाय म्हणताच जमलेल्या लोकांमधून “घे सुपारी, उठ दुपारी” अशी घोषणाबाजी झाली. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले “अरे आता दुपार झालीये. ते उठले असतील आणि बसले असतील सुपारी चघळत” असं म्हणत राज ठाकरे यांच्यावर नाव न घेता उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंवर जोरदार टीका केली.

 

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे हे काय बोलले?; भाजप आरएसएस वरही बंदी आणेल

इंडिया आघाडीच्या शपथविधीला या

सध्या जोरदार पैशांचा वाटप भाजपकडून होत आहे. परंतु, जे पैसे वाटले जात आहेत ते पैसेही खोटे वाटले जात आहेत असंही ठाकरे यावेळी म्हणाले. आज देशभरात यांच्याविरोधात वातावरण आहे. संपूर्ण देशात मतदार पेटला आहे. शापाचा आणि पापाचा पैसा कोणी घेत नाही. त्यामळे, नरेंद्र मोदी यांना मी 4 जून रोजी इंडिया आघाडीच्या पंतप्रधानाच्या शपथविधीसाठी या असं आजच आमंत्रण देतो असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी पुढचा पंतप्रधान इंडिया आघाडीचाच असेल असा ठोस दावा यावेळी केला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube