शेतकऱ्यांचे प्रश्न, NEET पेपरफुटीवरून काँग्रेसने सत्ताधाऱ्यांना घेरले, राज्यभर ‘चिखल फेको’ आंदोलन

  • Written By: Published:
शेतकऱ्यांचे प्रश्न, NEET पेपरफुटीवरून काँग्रेसने सत्ताधाऱ्यांना घेरले, राज्यभर ‘चिखल फेको’ आंदोलन

Congress president Nana Patole on neet exam and state issue : मुंबईः लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला (Congress ) घवघवीत यश मिळाले आहे. या यशानंतर काँग्रेसमध्ये नवसंजीवनी आली आहे. येत्या विधानसभेसाठी कार्यकर्त्यांमध्ये, नेत्यांमध्ये उत्साह राहावा, यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यामुळे सत्ताधारी भाजप, महायुतीविरोधात काँग्रेसने आज वेगवेगळ्या मुद्द्यांवर राज्यभर चिखल फेको आंदोलन केले आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे बिघडलेली आहे, महागाई, बेरोजगारीने लोकांना जगणे कठिण झाले आहे. सरकारने बियाणे आणि खतांचा काळाबाजार करून शेतक-यांची लूट सुरु आहे. NEET/strong> चे पेपर फोडून विद्यार्थ्यांचे भविष्य उद्धवस्त केल्याचा आरोप आंदोलनामध्ये करण्यात आला आहे. (Farmers’ questions, Congress surrounds the ruling party over NEET paper leak)

पत्रकार परिषदेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) म्हणाले की, राज्यातील भाजपा सरकारमध्ये भ्रष्टाचार बोकाळला आहे. डीबीटी योजनेतून शेतकऱ्यांना किटकनाशके, स्प्रे पंप, खते, औषधे दिली जातात पण त्यात 2700 रुपयांच्या स्प्रे पंपची किंमत वाढवून 4500 रुपये करण्यात आली आहे. इतर वस्तूही वाढीवदराने खरेदी करुन भ्रष्टाचार केला. या योजनेत बदल करायचा असल्यास कॅबिनेटची मंजुरी लागते असे कृषी आयुक्तांनी निदर्शनास आणून दिले असता त्या कृषी आयुक्तांचीच बदली करण्यात आली. या योजनेतून 11 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना लाभ झाला असता पण भाजपा सरकारने भ्रष्टाचार करुन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, असल्याचा आरोप पेटोले यांनी केलाय.

अजित पवार येऊ अथवा शरद पवार… तनपुरे कारखान्यावर कर्डिले स्पष्टच बोलले

केंद्र सरकारने काही पिकांची एमएसपी (हमी भाव) वाढवली पण या वाढीचा महागाईशी तुलना केली असती अत्यंत तुटपुंजी वाढ आहे. महागाईच्या दराप्रमाणे ही एमएसपी वाढ नाही. डिझेल, खते, बियाणे, शेती साहित्यांच्या वाढलेल्या किमती पहाता शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागत नाही. राज्यात प्रचंड दुष्काळ आहे, शेतकऱ्यांच्या फळबागा उद्ध्वस्थ झाल्या आहेत पण सरकार मात्र दुष्काळसदृष्य परिस्थीती आहे म्हणून शेतकऱ्यांची थट्टा करत असल्याची टीका पेटोले यांनी केली आहे.

ओबीसी बोगस आरक्षण खातायंत, हाकेंचा दोष नाही तर ‘येवल्या’वाल्याचा; जरांगेंनी धू-धू धुतलं…

NEET परीक्षा रद्द करा, पोलीस भरती पुढे ढकला. भाजपाच्या राज्यात सातत्याने पेपरफुटी होत आहे. नीट परिक्षेतही पेपरफुटला असल्याने ही परिक्षाच रद्द करण्याची मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे. आधी पेपरफुटलाच नाही असे केंद्रीय मंत्र्यांनी जाहीर केले पण राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली तेव्हा केंद्र सरकारला जाग आली. काँग्रेसने आज केलेल्या आंदोलनात नीट परीक्षा रद्द करावी अशी मागणीही केली आहे. तसेच राज्यात पाऊस सुरु असताना पोलीस भरती सुरु ठेवून भाजपा सरकार उमेदवारांच्या भवितव्याशी खेळत आहे. ही भरती पुढे ढकलावी अशी मागणी केली असतानाही सरकार त्याकडे लक्ष देत नाही असेही नाना पटोले म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज