कोकणात गोगावलेंची कोंडी? तटकरेंचा नवा डाव, स्नेहल जगताप राष्ट्रवादीच्या वाटेवर…

कोकणात गोगावलेंची कोंडी? तटकरेंचा नवा डाव, स्नेहल जगताप राष्ट्रवादीच्या वाटेवर…

Snehal Jagtap Will Join NCP Ajit Pawar Group : कोकणात भरत गोगावले (Bharat Gogawale) आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्यातील वाद लपून राहिलेला नाही. अशातच गोगावले यांची कोंडी करण्यासाठी सुनील तटकरे यांनी नवी रणनिती आखली, अशी चर्चा सुरू आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या महाडमधील नेते स्नेहल जगताप (Snehal Jagtap) या मशाल सोडून राष्ट्रवादीचं घड्याळ (Ajit Pawar) हाती घेतील, अशी दाट शक्यता वर्तवली जातेय. यामुळे राजकीय वर्तुळात चांगल्याच चर्चा रंगलेल्या आहेत.

आज महाडच्या सुतारवाडीमध्ये तटकरे आणि जगताप कुटुंबियांची भेट (Maharashtra Politics) झाली. महाडमधील ठाकरे सेनेचे शेकडो पदाधिकारी सुतारवाडीमध्ये उपस्थित होते. त्यामुळे स्नेहल जगताप या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार का? आणि प्रवेश केल्यास भरत गोगावलेंची डोकेदुखी वाढणार का? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

‘यांना’ पगारच माझ्यावर आरोप करण्यासाठी मिळतो, हा कचरा…आदित्य ठाकरेंचे नारायण राणेंना जोरदार प्रत्युत्तर

जगताप यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्यास कोकणात राष्ट्रवादीचा नवा अध्याय सुरू होवू शकतो. खासदार सुनील तटकरे यांच्या सुतारवाडी निवासस्थानीजगताप आणि तटकरेंच्या यांच्या भेटीमुळे नवे समीकरण उदयाला येण्याची शक्यता आहे.

महाड तालुक्यातील अनेक सहकाऱ्यांनी नाना जगताप आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली सदिच्छा भेट घेतली. तर ही केवळ सदिच्छा भेट होती. अनेक सहकारी उपस्थित होते. जो काही राजकीय निर्णय असेल तो योग्य वेळी योग्य ठिकाणी जाहीर करू, असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हटलंय. आता तटकरेंच्या या सूचक वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या नजरा उंचावल्या आहेत.

Video : परब अन् आक्रमकता?; भर पत्रकार परिषदेत राणेंनी हातवारे करत उडवली खिल्ली

रायगड जिल्ह्यातील महाड नगरीच्या माजी नगराध्यक्षा तथा माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या कन्या स्नेहल जगताप या देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला अखेरचा रामराम करण्याच्या तयारीत असल्याचं दिसतंय. त्यामुळे कोकणात पुन्हा ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची दाट शक्यता आहेत. जगताप अजित पवारांची साथ देत अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube