“आई शपथ! मी मुख्यमंत्री नाही पण ५ मिनिटांसाठी PM होणार”; जानकरांना भलताच विश्वास
Mahadev Jankar : ‘मी मुख्यमंत्री होणार नाही कारण मी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाही. मी मुख्यमंत्री आयुष्यात होणार नाही. पण पाच मिनिट का होईना पंतप्रधान झाल्याशिवाय राहणार नाही. मी मुख्यमंत्री कधीच होणार नाही, कधीच होणार नाही. आईची शपथ घेऊन सांगतो पाच मिनिटं का होईना पण हेलिकॉप्टर घेऊन भूम परांड्यातून फिरेन.’ हे शब्द आहेत राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकरांचे. सध्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे. प्रचार शेवटच्या टप्प्यात आला आहे. यातच रासपचे उमेदवार डॉ. राहुल घुले यांच्यासाठी जानकर (Mahadev Jankar) यांनी सभा घेतली. या सभेत त्यांनी हा विश्वास व्यक्त केला.
अखेर भाजपकडून मित्रपक्षांना न्याय!, आठवले, जानकर, राणा अन् कोरेंना प्रत्येकी 1 जागा
जानकर पुढे म्हणाले, तुम्हाला वाटलं असेल की महादेव जानकरांचं महायुती सोडण्याचं कारण काय. तर तुमच्यासमोर मन मोकळं करणं हे माझं कर्तव्य आहे. मी चाळीस वर्षात घरी गेलो नाही. संसार केला नाही. घरदार नाही. लग्नही केलं नाही. कुठे बंगला, गाडी, कॉलेज, दवाखाना की कारखानाही मी कधी विकत घेतला नाही. आता जे काही करतोय ते शेतकरी, दलित अन् सर्व लोकांच्या हितासाठी पक्ष उभा करण्याचं काम करतोय.
पक्ष का उभा करतोय तर महाराष्ट्रात दीडशे घराणी आहेत. या घराण्यांनी फक्त सातबाऱ्यावर लिहून ठेवलं आहे की भाजप असू द्या की काँग्रेस असू द्या किंवा राष्ट्रवादी असू द्या की शिवसेना असू द्या. माझा पाहुणा त्याचा मेव्हणा त्याचा सासरा ह्याचा जावई याच्याशिवाय खासदार आमदार करायचं नाही.
पवार साहेबांचं भाषण झालं बारामतीत. माझा बारामतीत उमेदवार आहे आणि पवारांच्या गावातच माझी सभा झाली. पवार साहेब त्या सभेत म्हणाले, बारामतीच्या लोकांनी तीस वर्षे माझ्यावर प्रेम केलं. तीस वर्षे अजित पवारांवर केलं. आता पुढील तीस वर्षे नातवाला द्या. अरे वा रे पठ्ठ्या पवार साहेब.. भारी काम आहे ही लोकशाही.. तुम्ही काय करायचं सतरंज्या वाहायच्या का? असा सवाल जानकर यांनी केला.
दहा आमदार आले तरीही मुख्यमंत्री आपल्या पक्षाचा..,; महादेव जानकरांनी रणशिंग फुंकलं