बीड : केज तहसील कार्यालयात नायब तहसीलदार पदावर असणाऱ्या आशा वाघ (Asha Wagh) यांच्यावर पेट्रोल टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याची घटना घडली आहे. या धक्कादायक प्रकाराने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. आशा वाघ या हल्ल्यातून थोडक्यात बचावल्या असून त्यांच्यावर केज येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्या केज तहसील कार्यालयातील, संजय गांधी निराधार […]
बीड : भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून खुली ऑफर मिळाली आहे. ठाकरे गटाच्या आमदाराने पंकजा यांना शिवसेनेत येण्यासाठी साद घातलीय. पंकजा मुंडे यांना शिवसेनेकडून आलेल्या या ऑफरवर भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी प्रतिक्रिया दिलीय. पंकजा मुंडेंना शिवसेनेकडून मिळालेल्या ऑफरवर बावनकुळे म्हणाले, पंकजा मुंडेचे आणि भाजपचे 22 वर्षापासूनचे […]
बीड : गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) नाराज असल्याची चर्चा सुरु आहे. पंकजा मुंडेंनी शिवसेनेत यावं त्यांचा मान सन्मान केला जाईल, अशी ऑफर शिवसेनेकडून (Shiv Sena) देण्यात आलीय. या ऑफरबद्दल पंकजा मुंडे यांना विचारले असता त्या म्हणाल्या, अशा प्रकारच्या ज्या चर्चा सुरु आहेत, यावर वेगळी पत्रकार परिषद घेईन. आमच्यात काहीच खदखद […]
औरंगाबाद : मराठवाडा शिक्षक मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार विक्रम काळे यांचे विश्वासू समजले जाणारे सुभाष भारतीय यांनी भाजपात प्रवेश केला आहे. सुभाष भारतीय ज्युनियर कॉलेज टीचर्स असोसिएशन संघटनेचे जिल्हाध्यक्ष आहेत. जिल्ह्यातील एक महत्वाचे नेते म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या भाजप प्रवेशाने राष्ट्रवादीचे उमेदवार विक्रम काळे यांना निवडणुकीत धक्का बसणार असल्याचं बोललं जातंय. सुभाष भारतीय […]
नाशिक: नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ निवडणुकीचे मतदान ३० जानेवारी २०२३ रोजी होणार आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी जाहीर झाली आहे. तांबेकडून मतदार नोंदणी जास्त झाली आहे. नाशिक विभागात एकून २ लाख ६२ हजार ७३१ मतदार आहेत, अशी माहिती सहा.निवडणूक निर्णय अधिकारी नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ तथा उपायुक्त (सा.प्र.) रमेश काळे […]
बीड : चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना परळी कोर्टाने (Parli Court) जारी केलेले अटक वॉरंट अवघ्या पाच ते सात मिनिटांत रद्द केलं आहे. यासोबतच त्यांना 500 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी परळी न्यायालयाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे अजामीनपात्र वॉरंट बजावले होते. त्यासाठी राज ठाकरे […]