कुणाची तरी जिरवायची होती म्हणून लोकसभा लढविली; आता विधानसभा लढणार…लंकेंची घोषणा

“कुणाची तरी जिरवायची होती म्हणून मी लोकसभा निवडणूक लढविली; मात्र आता येणारी विधानसभा निवडणूक मी स्वतः लढणार आहे.”

  • Written By: Published:
Untitled Design 37

MP Nilesh Lanke announces contest the assembly elections : आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खासदार नीलेश लंके यांनी पारनेर तालुक्याचा झंझावाती दौरा सुरू केला असून, या दौऱ्याच्या माध्यमातून त्यांनी कार्यकर्त्यांना थेट मार्गदर्शन करत निवडणूक रणधुमाळीचा बिगुल फुंकला आहे. पारनेर शहरात फटाक्यांच्या आतषबाजीत आणि घोषणाबाजीत खा. लंके यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दौऱ्याची सुरुवात झाली. त्यानंतर ढवळपुरी व टाकळी ढोकेश्वर गटात बैठका घेऊन कार्यकर्त्यांशी सविस्तर संवाद साधण्यात आला.

यावेळी बोलताना खा. लंके यांनी स्पष्टपणे सांगितले की, “कुणाची तरी जिरवायची होती म्हणून मी लोकसभा निवडणूक लढविली; मात्र आता येणारी विधानसभा निवडणूक मी स्वतः लढणार आहे.” तसेच, सन 2029 मध्ये मुंबईत सक्रिय राजकारण करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी आक्रमक भूमिका मांडली. “ज्या ठिकाणी अन्याय होईल, तिथे संघर्ष करा, धाक निर्माण करा आणि गरज पडल्यास आंदोलन करा. निवडणुका संपल्यानंतर कोणी कोणाला विचारत नाही, त्यामुळे गावोगाव संघटित होऊन जनतेच्या प्रश्नांवर सातत्याने काम करा,” असे आवाहन त्यांनी केले.

मोठी बातमी! बडा नेता ठाकरेंची साथ सोडणार, दुसऱ्यांदा बैठकीला मारली दांडी

आगामी निवडणुकांसाठी लक्ष्य निश्चित करताना त्यांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच किमान 85 ग्रामपंचायती ताब्यात घेण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यासाठी बूथस्तरावर संघटन मजबूत करण्यावर विशेष भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीनंतर आलेल्या मरगळीकडे लक्ष वेधत ते म्हणाले, “झाले गेले गंगेला मिळाले. नकारात्मक विचार सोडून सकारात्मकतेने कामाला लागा. मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.”

आपल्या कार्याचा आढावा देताना खा. लंके यांनी सांगितले की, मतदारसंघात 2 हजार कोटी रुपयांची विकासकामे करण्यात आली असून 1 लाख 51 हजार नागरिकांना वैयक्तिक मदत देण्यात आली आहे. तसेच, रुग्णालयातील गरजू रुग्णांची दरमहा 15 ते 20 लाख रुपयांची बिले माफ करून देण्याचे काम केले जात आहे. मुख्यमंत्री व पंतप्रधान सहायता निधीतून मोठ्या प्रमाणावर मदत मिळवून दिल्याचे त्यांनी नमूद केले.

follow us