ओबीसींबद्दल पराकोटीचा द्वेष! लायकी काढता, खुटा उपटण्याची भाषा करता…; भुजबळ जरांगेंवर संतापले
Chhagan Bhujbal on manoj jarange patil : कुणबी नोंदी असलेल्या मराठा समाजातील लोकांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र देऊन (Kunbi caste certificate) ओबीसी आरक्षणात (OBC reservation) समाविष्ट केले जाईल. याशिवाय कुणबी नोंद असलेल्या व्यक्तीच्या शपथपत्रावर त्यांच्या सगेसोयऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्यची देण्याची मागणीही राज्य सरकारने मान्य केली आहे. मात्र, राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात ओबीसी नेते एकवटले आहेत. राज्याचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यासह ओबीसी नेत्यांनी सरकारच्या निर्णयाचा निषेध केला. तर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी सगेसोयऱ्यांबाबतच्या कायद्याशी दगाफटका झाला तर मंडल आयोगाला (Mandal Commission) आव्हान देईल, असा इशारा दिला. त्यावर आता भुजबळांनी प्रतिक्रिया दिली.
दादागिरीची भाषा वापरू नये, अन्यथा पाय उखडून टाकू; रुपाली पाटलांचा संजय गायकवाडांना इशारा
मंडल आयोगला आव्हान देण्याची भाषा तुम्ही करता? एकीकडे तुम्ही त्याच ओबीसी प्रवर्गात आरक्षण हवं म्हणून आंदोलन उभारता, मागासवर्गीयांची लायकी काढता, खुंटा उपटण्याची भाषा करता आणि दुसरीकडे तेच आरक्षण रद्द करण्याची भाषा करता? हा काय प्रकार आहे? असा सवाल भुजबळांनी केला.
सत्तेतल्या नेत्यांना वाटतंय की आम्ही घाबरलोयं पण..,; ईडी चौकशीनंतरही रोहित पवारांचा तोरा कायम
छनग भुजबळ यांनी एक्सवर एक पोस्ट लिहिली. त्यात ते म्हणाले, मंडल आयोगाला आव्हान देण्याची आणि ओबीसी आरक्षण संपवण्याची भाषा उपोषणकर्ते करत आहेत! ज्या मंडल आयोगामुळे बारा बलुतेदार आणि भटक्या विमुक्त समाजांतील गोर गरिब लोकांना आरक्षणाचा हक्क मिळाला, त्यांची मुले शिक्षण घेऊ लागली, त्यांना मुख्य प्रवाहात येण्याची संधी मिळू लागली. त्यांना राजकीय प्रतिनिधित्व मिळण्यास सुरूवात होऊन राज्याच्या धोरणनिर्मितीत त्यांचा विचारा होऊ लागला आणि त्यांचा विचार घेतला जाऊ लागला. त्या मंडल आयोगाला आव्हान देण्याची भाषा तुम्ही करता? एकीकडे तुम्ही त्याच ओबीसी प्रवर्गात आरक्षण हवं म्हणून आंदोलन उभारता, मागासवर्गीयांची लायकी काढता, खुंटा उपटण्याची भाषा करता आणि दुसरीकडे तेच आरक्षण रद्द करण्याची भाषा करता? हा काय प्रकार आहे? असा सवाल भुजबळांनी केला.
मंडल आयोगाला आव्हान देण्याची आणि ओबीसी आरक्षण रद्द करण्याची भाषा ‘उपोषणकर्ते’ करत आहेत!
ज्या मंडल आयोगामुळे बारा बलुतेदार आणि भटक्या विमुक्त समाजांतील गोरगरीब लोकांना आरक्षणाचा हक्क मिळाला, त्यांची मुले शिक्षण घेऊ लागली, त्यांना मुख्य प्रवाहात येण्याची संधी मिळू लागली, त्यांना…
— Chhagan Bhujbal (@ChhaganCBhujbal) February 1, 2024
भुजबळांनी पुढं लिहिलं की, यावरून दोन निष्कर्ष स्पष्टपणे काढता येतात. एक म्हणजे- ओबीसी जातींबद्दलचा तुमचा पराकोटीचा द्वेष यातून दिसतो. तुमच्या मनात या जातींबद्दल इतका द्वेष का आहे? त्यांनी तुमचं काय वाईट केलंय? दुसरे म्हणजे – तुम्हाला आता ‘तो’ मसुदा कायद्याच्या कसोटीवर टिकणार नाही, याची जाणीव झालेली दिसते. नाहीच टिकणार! त्यामुळं आम्हाला नाही तर कोणालाच नाही, अशी तुमची भाषा येऊ लागली आहे.
अशा संविधानविरोधी गोष्टींना या देशात थारा नाही! महाराष्ट्रातील समस्त ओबीसी समाज ही दादागिरी, हा असंवैधानिक प्रयत्न नक्कीच हाणून पाडणार, असं आव्हानच भुजबळांनी दिलं.