जातीयवादाचा चेहरा असता तर सेम टू सेम रोहित पवारसारखा असता; पडळकरांची घणाघाती टीका

  • Written By: Published:
जातीयवादाचा चेहरा असता तर सेम टू सेम रोहित पवारसारखा असता; पडळकरांची घणाघाती टीका

Gopichand Padalkar : कुणबी नोंद असलेल्या व्यक्तीच्या शपथपत्रावर त्यांच्या सगेसोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी सरकारने मान्य केली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात ओबीसी नेते एकवटले आहेत. राज्यात ठिकठिकाणी ओबीसी मेळावे होत आहेत. आज नगरमधील ओबीसी मेळाव्यात ओबीसी नेते गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी राज्य सरकार आणि आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यावर जोरदार टीका केली. रोहित पवार हे जातीयवादी असल्याची टीका पडळकरांनी केली.

ओबीसी महा एल्गार मेळाव्याला विजय वडेट्टीवारांसह राम शिंदेंची दांडी 

अहमदनगर येथील क्लेरा ब्रुस हायस्कूलच्या मैदानावर आज (दि. 03) ओबीसींच्या महाएल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात ओबीसी नेते गोपीचंद पडळकर यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. या मेळाव्यात बोलतांना ते म्हणाले, रोहित पवार नावाचं जातीयवादी नेतृत्व या जिल्ह्यात आहे. हे पार्सल तुम्ही बारामतीला पाठवणार का नाही? रोहित पवारांच्या अंगात रक्त नाही तर जातीयवाद वाहतो. जातीयवादाचा चेहरा असता तर सेम टू सेम रोहित पवार दिसला असता, अशी टीका त्यांनी केली.

Chhagan Bhujbal : अंबड रॅलीच्या आदल्या दिवशीच राजीनामा दिला होता; भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट 

पुढं बोलतांना ते म्हणाले, या जिल्ह्यात ज्या माऊलीने जन्म घेतला, त्यांनी साम्राज्य निर्माण केलं. राजा वही बनेगा, जो हकदार होगा… राजा का बेटा राजा नही बनेगा, राज्यकर्ते, सत्ताधारी जर माजले असतील तर ती सत्ता हिसकाऊन घ्या असं अहिल्याबाई होळकरांनी सांगितलं. त्यामुळं आपलं सामाज्य तयार करू. भुजबळांच्या मागे सर्वांना उभे राहा. भुजबळ हे एकटे नाहीत, आपण सगळे आहोत. हा लढा एकट्या भुजबळ, पळकरांसाठी नाही तर ओबीसींवर घाला घालणाऱ्यांविरोधात आहे. हा ओबीसींच्या हक्कांच्या रक्षणासाठी हा संघर्ष आहे, असं पडळकर म्हणाले.

राजसत्ता आणि राजपाद मागून मिळत नाही, तो हिसकाऊनच घ्यायची असते. जर आमच्या आरक्षणाला धक्का लावण्याचा प्रयत्न होत असेल तर ओबीसींना एकत्र येण्याची गरज आहे. ओबीसींचा आवाज दाबू शकत नाही. आता ओबीसी समाज तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असं पडळकर म्हणाले.

शेंडगे काय म्हणाले?
निवडणुकीच्या रंणसंग्रामात ओबीसींचा झेंडा फडकणार आहे. आजवर ओबीसी मतदारांनी मराठा समाजाचे राजे मतपेटीतून बाहेर काढले. आता मतपेटीतून आपल्याला आपला राजा बाहेर काढायचा आहे. ओबीसी मुख्यमंत्री होईल तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रात भंडारा उधळवू, मराठ्यांना गुलाल उधळायची संधीच मिळू देणार नाही, असं शेंडगेंनी ठणकावलं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube