सातारा, सांगलीसह मराठवाड्यात कोसळणार; आज ‘या’ 15 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट

Maharashtra Rain Today : राज्यात सध्या मान्सूनचा पाऊस सर्वदूर बरसत (Maharashtra Monsoon Update) आहे. ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर (Heavy Rain) वाढला आहे. शुक्रवारी मुंबई, नवी मुंबई, पुण्यासह मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस (IMD Rain Alert) झाला. आजही पावसाचा जोर कायम राहणार आहे. काही ठिकाणी ढगाळ हवामान आहे. हवामान विभागाच्या नव्या अंदाजानुसार येत्या दोन दिवसांत मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाचा जोर वाढणार आहे. आज सातारा, सांगलीसह मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार मध्य महाराष्ट्र, कोकण, गोव भागात 14 ते 16 ऑगस्ट दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता आहे. रक्षाबंधनानंतर पुढील दोन दिवस मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. पुढील तीन दिवसांत राज्यात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. आज काही भागात सूर्यदर्शन झाले आहे.
आजच्या दिवस छत्री जवळ ठेवाच! पुणे-मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; अंदाज काय?
हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, बीड, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, बुलढाणा, अकोला, वर्धा, नागपूर या जिल्ह्यांना यलो अलर्ट आहे. मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, नाशिक, नगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव या जिल्ह्यांतही पावसाची शक्यता आहे.
11 ऑगस्टला बीड, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलढाणा, अकोला आणि चंद्रपूर जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. 12 ऑगस्ट रोजी बीड, धाराशिव, लातूर, बुलढाणा, अकोला, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांना तर 13 ऑगस्ट रोजी रत्नागिरी, रायगड, परभणी, हिंगोली, नांदेड, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
10 Aug, 9.30 am, possibility of light to mod showers over parts of Palghar, Sindhudurg & south of Marathwada, adj areas of NIK & Telangana during next 1,2 hrs at isolated places.
Watch for nowcast by IMD.
Partly cloudy over konkan Goa region. pic.twitter.com/jS3s1nHe7c— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 10, 2025
कालपासून राज्यात अनेक ठिकाणी चांगला पाऊस होत आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात दमदार पावसाने हजेरी लावली आहे. या भागात नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. शहरातील सखल भागात पाणी साचले आहे. धाराशिवमध्ये सर्वाधिक 70 मिमी पावसाची नोंद झाली आहे. आजही या भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
प्रशासनाच्या नागरिकांना सूचना
नागरिकांनी अशा परिस्थितीत घराबाहेर न घोंडता सतर्क राहावं; प्रशासन आणि बचाव यंत्रणांनी पूर, व्यापार आणि रहदारी व्यवस्थापनासाठी सज्ज राहावं, ही विनंती संबंधित अधिकाऱ्यांनी केली आहे. नागरिकांनी शक्यतो घराबाहेर न पडता, अलर्टची सतत माहिती घेत, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. फारच महत्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडता येईल.