अहमदनगर : कांदा निर्यात बंदीमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. दर पडत असल्याने शेतकरी रस्त्यावर उतरुन आंदोलने करत आहेत. याच मुद्द्यावरुन आता खासदार सुजय विखे पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याचे सांगितले आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शिवाजीराव […]
Manoj Jarange : मनोज जरांगे पाटील यांनी आता 20 जानेवारीपासून मुंबईत (Manoj Jarange) उपोषण सुरू करणार असल्याची घोषणा केली आहे. त्यांनी उपोषणाचा निर्णय घेऊ नये अशी विनंती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केली होती. मात्र जरांगे पाटील आपल्या निर्णयावर ठाम आहेत. आमची सगळी तयारी झाली आहे. आम्ही सज्ज आहोत. आता न्याय घेतल्याशिवाय माघार नाही, असे वक्तव्य करत […]
Sanjay Raut Press : राज्याचे मुख्यमंत्री सध्या डॉक्टर झाले आहेत. आज मुख्यमंत्री, उद्या फडणवीस, अजित पवार, हसन मुश्रीफ, भावना गवळी सगळे डॉक्टर होतील आणि मग डॉक्टरांचं मंत्रीमंडळ तयार होईल, असा टोला संजय राऊतांनी (Sanjay Raut) राज्य सरकारला लगावला आहे. देवेंद्र फडवणीस हे डॉक्टर पदवीसाठी योग्य व्यक्ती असून, आम्हाला ही डॉक्टरकी नको, आम्ही त्या लायक नसल्याचेही […]
Prakash Ambedkar : देशातल्या मंदिरातील पुजारी विद्यापीठातून पदवीधर असावा, हा कायदा करा मग तो पुजारी कोणत्याही जातीचा चालेल, असा सल्ला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला दिला आहे. दरम्यान, नागपुरात आज मनस्मृती दिनानिमित्त आयोजित स्त्रीमुक्ती दिन परिषदेत आंबडेकर बोलत होते. यावेळी आंबेडकरांनी विविध मुद्द्यांवरुन आरएसएस आणि महाविकास आघाडीवर टोलेबाजी […]
Devendra Fadanvis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)यांनी आज (25 डिसेंबर) पुण्यामध्ये भारताचे दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या अटल संस्कृती गौरव पुरस्कार या कार्यक्रमांमध्ये संबोधित केलं. यावेळी बोलताना त्यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावरून ‘तुमच्या छातीवर चढून राम मंदिर बनवले ! हिम्मत असेल तर या अयोध्याला’ असं म्हणत विरोधकांवर चांगलाच हल्लाबोल केला. तुमच्या छातीवर चढून […]
Manoj Jarange : मराठा-कुणबी एकच आहेत. मराठा समाजाच्या 54 लाख नोंदी सापडल्या आहेत. त्यामुळे हरिभाऊ राठोड यांच्या फॉर्म्युल्याप्रमाणे फक्त निम्म्याच मराठा समाजाला आरक्षण मिळत आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षणाचे अभ्यासक हरिभाऊ राठोड (Haribhau Rathod)यांनी सांगितलेला फॉर्म्यूला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी नाकारला आहे. काँग्रेसवर डोनेट फॉर देश मोहीम चालविण्याचा वेळ का आली ? काँग्रेस व […]