अहमदनगर : श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार बबनराव पाचपुते यांचा मुलगा प्रतापसिंह पराभूत झाले. त्यांना बबनराव पाचपुतेंचे पुतणे साजन पाचपुते यांनी पराभूत केले. या निवडणुकीची राज्यभर चर्चा झाली. कुटुंबातील सदस्याविरोधात निवडणूक का लढविली ? याबाबत साजन पाचपुते यांनी लेट्सअपशी संवाद साधला. मी आणि प्रतापसिंह हे एका आईची लेकरे नसल्याचे सांगत आगामी काळातही सत्तासंघर्ष सुरूच […]
पुणे : फोन टॅपिंग प्रकरणात आयपीएस अधिकारी रश्मी शुक्लांच्या अडचणीत वाढ होऊ शकते. पुणे पोलीसांचा क्लोजर रिपोर्ट पुणे न्यायालयाने फेटाळला आहे. राजकीय नेत्यांचे फोन टॅप केल्याचा गंभीर आरोप रश्मी शुक्ला यांच्यावर होता. राज्यात सत्ताबदल होताच रश्मी शुक्ला यांना क्लिन चिट देण्यात आली होती. या संदर्भात पुणे पोलीसांनी क्लोजर रिपोर्ट पुणे न्यायालयात सादर केला होता. परंतु, […]
मुंबई : वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारच्या निर्देशानंतर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी आता कोरोना नमुन्यांच्या जीनोम सीक्वेन्सिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दोन वर्षांनंतर आता पुन्हा एकदा कोरोना विषाणुने डोकं वर काढलंय. जगभरात कोरोना विषाणुचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारच्या आदेशानुसार […]
अमरावती : येथील फार्मासिस्ट उमेश कोल्हे प्रकरणात नॅशनल इंटेलिजन्स एजन्सी अर्थात एनआयएकडून 11 जणांविरोधात आरोपपत्र दाखल केलंय. भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट टाकल्यामुळंच उमेश कोल्हे यांची हत्या झाली होती, असा मोठा खुलासा एनआयएकडून करण्यात आलाय. एनआयएकडून सांगण्यात आले की, ज्या व्यक्तीने उमेश कोल्हेंची हत्या केली, तो तबलिगी जमातचा होता आणि पूर्णपणे […]
नागपूर – महाविकास आघाडीला ग्रामपंचायत निवडणुकीत ३ हजार २५८ सरपंच पदे तर महाराष्ट्रात सर्वाधिक जागा मिळाल्याची माहिती राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली. भाजप आणि शिंदे गटाला ३ हजार १३ सरपंच व इतर १ हजार ३६१ आहेत. यामध्ये ७६१ हे महाविकास आघाडीशी संबंधित आहेत. महाविकास आघाडी आणि मित्र पक्षाचे ४ हजार १९ सरपंच निवडून […]
नागपूर : शाळेत होत असलेल्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी शाळेत टप्प्याटप्प्यानं सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासह शाळा महाविद्यालय परिसरात असलेल्या कॅफेटेरियांवर निर्बंध लावावेत, अशी आग्रही मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. अल्पवयीन मुलींना स्वसंरक्षणाचे धडे व शाळेत सीसीटीव्ही बसवणे आवश्यक आहेत, त्याबाबत सरकारनं काही उपाययोजना केल्यात का? त्याचबरोबर अल्पवयीन मुलांच्या हातून लैंगिक गुन्ह्यांचे प्रकार समोर […]