मुंबई : तिरुपती येथे दर्शनासाठी गेलेल्या सोलापूर (Solapur) येथील भाविकांच्या वाहनाला बुधवारी अपघात झाला. त्यात सोलापूर येथील पाच तरुणांचा मृत्यू झाला आणि चार जण जखमी झाले. या दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दु:ख व्यक्त करतानाच मृतांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त केल्या आहेत. या अपघातात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख रुपये मदत देण्याची घोषणा […]
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नुकतीच ८१६९ अशी इतिहासातील सर्वात मोठी अशी विविध पदांची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यापैकी लिपिक-टंकलेखन संवर्गातील तब्ब्ल ७०४३ पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहे. परंतु, लिपिक पदासाठी पूर्व परीक्षेचा संपूर्ण महाराष्ट्रात एकच कट ऑफ लावावा अशी मागणी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीनेचे कार्याध्यक्ष महेश घरबुडे यांनी केली आहे. याबाबतचे पत्र त्यांनी आज […]
पुणे : देशाचे संविधान, घटना मानायची नाही. नव्या व्यवस्थेच्या नावाखाली जुनीच पण तुम्हाला हवी असलेली मनुस्मृती आणण्याचे प्रयत्न राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि भारतीय जनता पार्टी (BJP) यांच्या कृतीतून दिसत आहे. गेल्या काही वर्षातील त्यांची वाटचाल, कृती हे आपल्याला स्पष्टपणे हेच सांगत आहे. माणसाला धर्म असतो. देशाला धर्म नसतो, असे आम्ही मानणारे लोकं आहोत. तर […]
पुणे : आधी देशातील विरोधी पक्षनेतृत्व संपवले. मग स्वतःच्याच पक्षातील नेतृत्व संपवले. कारण भाजपमध्ये मोदींनंतर दुसरा नेता कोण, हे कोणालाच समजत नाही, असा थेट आरोप करत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची वाटचाल ही हिटलर शाहिकडे सुरु आहे, असा हल्लाबोल वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर केला आहे. तसेच […]
नाशिक : महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाची निवडणूक ३० जानेवारी २०२३ रोजी पार पडणार आहे. या दिवशी निवडणूक प्रक्रिया मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडावी यासाठी मद्यविक्री करण्यास मनाई करण्यात आली आहे. याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने २५ जानेवारी २०२३ रोजी आदेश पारित केले आहेत. यादिवशी मद्य विक्रीसाठी कोरडा दिवस म्हणून पाळणे अनुज्ञप्तीधारकांवर […]
पुणे : स्वतंत्र्यावीर सावरकर हे सर्वांचे हिरो आहेत. याबद्दल दुमत नाही. त्यांनी अंदमानमध्ये यातना भोगल्या हेही खरे आहे. मात्र, सावरकरांच्या हिंदू महासभेने त्याकाळी सातारा, सांगली, कोल्हापूर, कारवार, निपाणी या परिसरातील क्रांतीकारकांना पकडून इंग्रजांच्या ताब्यात दिले. हे विसरून चालणार नाही. नेमके हेच काँग्रेसचे युवराज राहुल गांधी यांना माहिती नाही. त्यांनी आधीचे सावरकर पकडले नाही. तर केवळ […]