- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
भूमिपूजन फलकाचा वाद पेटला! दंड थोपटत आशुतोष काळेंनी कोल्हेंना ललकारलंच…
अहमदनगरमधील कोपरगाव तालुक्यात भाजप नेते विवेक कोल्हे आणि राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे दोन्ही नेते एकमेकांसमोर उभे ठाकल्याचं दिसून आलं आहे. कोपरगावातील रस्त्याच्या भूमिपूजन फलकाच्या वादावरुन दोन्ही नेत्यांच्या समर्थकांमध्ये चांगलीच धुमश्चक्री झाली आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी आमदार काळेंनी खांद्यावर घेतल्यानंतर आशुतोष काळेंनी थेट दंडच थोपटत विवेक कोल्हेंना ललकारल्याचं चित्र दिसून आलं आहे. यावेळी कार्यकर्ते एकमेकांशी भिडले होते. […]
-
स्वातंत्र्यदिनी फडणवीस गडचिरोलीत; इतिहासात पहिल्यांदाच शासन सिमेवरील पिपली बुरगीत
नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज (15 ऑगस्ट) स्वातंत्र्यदिनी गडचिरोलीचा दौरा केला. यावेळी त्यांच्या हस्ते जिल्ह्यातील पिपली बुरगी येथील बहुप्रतिक्षित क्रांतिवीर बाबूराव शेडमाके-कोठी कोरनार पुलाचे उद्घाटन करण्यात आले. याशिवाय विविध विकास कामांचे लोकार्पणही त्यांच्या हस्ते करण्यात आले. फडणवीसांच्या दौऱ्याचे वैशिष्ट्य म्हणजे, पहिल्यांदाच शासन अतिसंवेदनशील समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र आणि छत्तीसगड सीमेवरील पिपली बुरगी […]
-
Pasha Patel : “अभिमन्यू पवार यांना मंत्रिपदासाठी फडणवीसांचा आशीर्वाद”; निलंगेकरांचा पत्ता कट?
लातूर : आगामी मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपदासाठी अभिमन्यू पवार यांच्याशिवाय पक्षश्रेष्ठींसमोर दुसरे नावच नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचीही आमदार पवार यांच्यावर कृपा आहे, असे म्हणत भाजपचे माजी आमदार आणि कृषी मुल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी खळबळ उडवून दिली आहे. पटेल यांच्या या दाव्यानंतर आता माजी मंत्री आणि निलंग्याचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर […]
-
Sambhaji Bhide : भगव्या राष्ट्रध्वजासाठी संभाजी भिडे आक्रमक; सांगलीत शेकडो कार्यकर्त्यांसह पदयात्रा
Sambhaj Bhide News : वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत असलेले शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे(Sambhaji Bhide) यांनी आज सांगलीत पदयात्रा काढली. भगव्या राष्ट्रध्वजाच्या मागणीसाठी आज स्वातंत्र्यदिनी त्यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह ही पदयात्रा काढली होती. ऐन स्वातंत्र्यदिनीच ही पदयात्रा काढण्यात आल्याने वादाची ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावेळी असंख्य कार्यकर्ते पदयात्रेत सहभागी झाल्याचं दिसून आलं. विशेष म्हणजे […]
-
काका-पुतण्याची जवळीक; ‘मविआ’त नव्या घडामोडी : आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी काँग्रेस अनुकूल
मुंबई : राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील वाढत्या जवळकीतेमुळे महाविकास आघाडीत वेगळ्या घडामोडीचे संकेत मिळत आहेत. ऐनवेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार यांच्या गटासोबत जाण्याचा निर्णय घेतल्यास तयारी म्हणून काँग्रेसने ‘प्लॅन बी’वर काम सुरु केले आहे. याच प्लॅनचा भाग म्हणून काँग्रेस आता वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यासाठी अनुकूल असल्याचे बोलले जात आहे. हिंदुस्थान टाईम्सने एका […]
-
Eknath Shinde : ‘मुख्यमंत्री बदलणार’ म्हणणाऱ्यांना एकनाथ शिंदेंचं खोचक प्रत्युत्तर…
Cm Eknath Shinde : विरोधकांना राजकारण करु द्या, मी माझं काम करणार, अशा तिखट शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीका केली आहे. काल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी मुख्यमंत्रिपदाबाबत आरोप केला. या आरोपावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वडेट्टीवारांना खोचक प्रत्युत्तर दिलं आहे. रायगड जिल्ह्यातील ईर्शाळवाडीत गावात पाहणीदरम्यान, मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. Donald Trump : डोनाल्ड […]









