फडणवीसांनी सूडाचं, जाती-धर्माचं राजकारण सुरु करुन राज्य रसातळाला नेलं -राऊत
संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचा सत्यानाश केला असा थेट आरोप केला आहे.

Sanjay Raut Press : लोकसभा निवडणुकीत भाजपला अपेक्षित असं यश ना देशात मिळालय ना महाराष्ट्रात.(Devendra Fadnavis) महाराष्ट्रात भाजपला दोन आकडी संख्याही गाठता आलेली नाही. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पराभवाची जबाबदारी आपण घेत असून लवकरच उपमुख्यमंत्री आपण सोडणाल असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. (Sanjay Raut ) तशा प्रकारची मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, यावर बोलताना राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांवर जोरदार टीका केली आहे. ‘देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातल्या राजकारणातले खलनायक आहेत’ अशा शब्दांत राऊतांनी फडणवीसांवर प्रहार केलाय.
पेशवाईतल्या आनंदीबाईं आमच्या नादाला लागू नका, संजय राऊतांचा राणांना थेट इशारा
मी अत्यंत कटुतेने बोलतो आहे. कारण राजकारणातली पिढी संपवायचं काम फडणवीसांनी केलं. हातातल्या सत्तेचा वापर राजकारणात सूड घेण्यासाठी केला. न्यायालयांवर दबाव आणला, न्यायमूर्तींवर दबाव आणला, धमक्या देण्यात आल्या. पोलिसांचा वापर राजकीय कामांसाठी केला. या सगळ्याचा उद्रेक होतोच. आज लोकांनी त्यांना उत्तर दिलं. जेवढा राग मोदी शाह यांच्यावर नाही तेवढा देवेंद्र फडणवीसांवर आहे. विदर्भात नितीन गडकरींची जागा सोडली तर विदर्भात फडणवीसांची भाजपा रसातळाला गेली. राजीनामा द्यायची गरज काय? लोकांनीच तुम्हाला घरी पाठवलं आहे. सूडाचं, जाती-धर्माचं राजकारण सुरु करुन राज्य रसातळाला नेलं. आधी त्यांनी स्वतःच्या घरात काय झालं आहे ते फडणवीसांनी बघावं असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसंच, फडणवीस हे पेशवाईतल्या आनंदीबाईंप्रमाणे वागत आहेत असा घणाघातही त्यांनी केला आहे.
महाराष्ट्रात दळभद्री आणि घाणेरडं राजकारण
नवाब मलिक, अनिल देशमुख यांना जाऊन भेटा, महापालिकेतल्या लोकांवर खोट्या केस करण्यात आल्या. या सगळ्या कारनाम्यांमुळे त्यांच्यावर आज रडण्याची वेळ आली. मी पुन्हा येईन, दोन पक्ष फोडून येईन जे दोन पक्ष त्यांनी फोडले त्याच पक्षांनी त्यांच्यावर अश्रू ढाळण्याची वेळ आणली आहे. अजून तुम्हाला बरंच काय काय बघायचं आहे. जे काही करायचं आहे ते करा पण महाराष्ट्राच्या इतिहासात तुमचं नाव काळ्याकुट्ट अक्षरांत लिहिलं जाईल. तुम्ही महाराष्ट्राची वाट लावली. मराठी माणसाच्या स्वाभिमानाची वाट लावलीत. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना तुम्ही फोडलीत, याचा सूड महाराष्ट्र तुमच्यावर सातत्याने घेत राहिलं असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर फडणवीसांनी महाराष्ट्रात दळभद्री आणि घाणेरडं राजकारण केलं, लोकसभा निवडणुकीत त्यांना जागा दाखवली. ज्या गुदगुल्या त्यांना काही काळ झाल्या त्या अस्वलाच्या गुदगुल्या होत्या असाही टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
पंतप्रधान पदासाठी दुसरं नाव
माझ्या माहितीप्रमाणे नरेंद्र मोदींचा पंतप्रधानपदाचा मार्ग सरळ नाही. गेल्या दोन निवडणुकांमध्ये त्यांनी ज्या रुबाबात मोदी पुढे जात होते ते चित्र आज दिसत नाही. मोदींची भाषा बदलली आहे. बॉडी लँग्वेज बदलली आहे. संघाचा विरोध आहे, पक्षांतर्गत विरोध आहे. मोदी एका अर्थाने पराभूत झालेत असा माणूस पंतप्रधान कसा होऊ शकतो? असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला आहे. त्याचबरोबर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मोदी नको आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून आता दुसऱ्या नावाचा शोध घेतला जात आहे असं म्हणत राजनाथ सिंह किंवा नितीन गडकरी यांचं पंतप्रधानपदासाठी नावं पुढं येऊ शकतो असा दावाही राऊतांनी केला आहे.