‘कुणी काकाचा तर कुणी दुसऱ्याच्या बापाचा पक्ष चोरतोय, हिंमत असेल तर’.. राऊतांचा पवार-शिंदेंवर हल्लाबोल
Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर टीकास्त्र सोडले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाविरुद्ध संताप व्यक्त केला. या मु्द्द्यावर उद्धव ठाकरे मंगळवारी पत्रकार परिषद घेणार असल्याचे सांगितले. कुणी काकाचा तर कुणी दुसऱ्याच्या बापाचा पक्ष चोरतोय अशा शब्दांत त्यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. संजय राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सत्ताधारी गटावर जोरदार टीका केली.
राऊत पुढे म्हणाले, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे या निकालाविरोधात मंगळवारी उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेणार असून देशाच्या इतिहासातील ही पहिलीच खुली पत्रकार परिषद असेल. यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. उद्धव ठाकरे यांच्याकडे कार्यकर्ते आहेत. त्यासाठीचे ते राज्यभरात दौरे करत असतात. पण एकनाथ शिंदे यांनी हिंमत असल्यास स्वतःचा पक्ष स्थापन करून दाखवावा.
मोदींनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलणं टाळलं; संजय राऊत म्हणाले, केवळ धर्माच्या नावावर
एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांनीही स्वतःचा पक्ष स्थापन करावा. कुणी काकाचा तर कुणी दुसऱ्याच्या बापाचा पक्ष चोरतोय. दिल्लीतील बापाच्या ताकदीवर पक्ष चोरले. एकदा स्वतःचा पक्ष स्थापन करा आणि मग आमच्यासमोर उभे राहा असे आव्हान राऊत यांनी यावेळी दिले.
काँग्रेसने आता भूमिका स्पष्ट करावी
मिलींद देवरा (Milind Deora) यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिले. आता ते लवकरच शिंदे गटात प्रवेश करतील अशी शक्यता आहे. या घडामोडींवर संजय राऊत यांनी भाष्य केले. महाराष्ट्रात सध्या पक्ष बदलाची प्रथा सुरू आहे. मिलिंद देवरा यांच्याबाबत काँग्रेस पक्षाने भूमिका स्पष्ट करावी. पण, दक्षिण मुंबईची जागा शिवसेनेची होती. त्यामुळे जर ती जागा शिवसेनेने लढवली तर त्याच चुकीचं काय, असा सवाल संजय राऊत यांनी केला.
‘संजय राऊतांसारखे भूत आवरा’; जहरी टीका करत गुलाबराव पाटलांचा उद्धव ठाकरेंना सल्ला