शेतकऱ्यांचा साथीदार बैल सजला; आज देशभरात बैलपोळ्याचा सण, वाचा का साजरा करतात पोळा?

शेतकऱ्यांचा साथीदार बैल सजला; आज देशभरात बैलपोळ्याचा सण, वाचा का साजरा करतात पोळा?

Bail Pola 2025 : आज शुक्रवा (दि. 22 ऑगस्ट 2025) महाराष्ट्रात बैल पोळा सर्वत्र साजरा होत आहे. बैल पोळा हा सण शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा आणि आनंदाचा मानला जातो. या दिवशी श्रावण महिना समाप्त होतो. (Farmer) वर्षभर शेतामध्ये काम करणाऱ्या बैलांप्रती प्रेम आणि जिव्हाळा व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. हा सण भारतामध्ये विविध भागामध्ये शेतकरी मोठ्या उत्साहात साजरा करतात. हा सण प्रामुख्याने महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड, विदर्भ, तेलंगणा आणि काही दक्षिणेकडील भागात साजरा होतो. याला पिठोरी अमावस्या किंवा पोल्या असंही म्हणतात.

काय आहे या दिवसाचं महत्त्व, पौराणिक कारण जाणून घ्या..

बैलपोळा का साजरा करतात?
बैलांचे महत्त्व
शेतीमध्ये बैल हे शेतकऱ्याचे मुख्य साथीदार असतात. नांगरणी, पेरणी, वाहतूक यासाठी बैलांचा उपयोग होतो. त्यांचं परिश्रम मान्य करून, त्यांना मान देण्यासाठी पोळा साजरा केला जातो.

कृतज्ञतेचा सण
जसे आपण दिवाळीला घर-देवता, होळीला अग्नी, तसा पोळा हा बैलांसाठी असतो. शेतकरी आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा करतो.

बैलांची पूजा
या दिवशी बैलांना स्नान घालतात, त्यांना तेल लावतात, शिंगांना रंगवतात, झगमगते हार-फुले, गळ्यात माळ घालतात. त्यांना गोड खाऊ घालतात.

समृद्धीची प्रार्थना
बैलांची पूजा करून शेतकरी समृद्ध पिकं, चांगले आरोग्य आणि कष्टाची योग्य फळे मिळावीत यासाठी प्रार्थना करतो.

पौराणिक कारण

असेही मानतात की, भगवान शंकराचे वाहन नंदीबैल आहे. त्यामुळे बैलाची पूजा केली की शिवाची कृपादृष्टी मिळते.

बैल पोळा दिवशी केले जाणारे विधी आणि उपाय
बैलांना स्नान घालणे
सकाळी लवकर बैलांना नदीत, विहिरीत किंवा घराजवळ पाण्याने स्नान घालतात. त्यानंतर त्यांना तेल लावले जाते.

शिंगे सजवणे
शिंगांना रंगीत पावडर, पेंट किंवा आकर्षक कापडाने सजवतात. काही ठिकाणी सोन्याचे/चांदीचे कळसही लावतात.

पूजा आणि हळदीकुंकू
बैलांच्या कपाळी कुंकवाचा टिळा लावून, हार-फुले, माळा घालतात. त्यांना अगरबत्ती, ओवाळणी करून गोड पदार्थ खाऊ घालतात.

विश्रांतीचा दिवस
या दिवशी बैलांना शेतात कामाला जुंपत नाहीत. त्यांना विश्रांती दिली जाते.

मिरवणूक
गावोगावी सजवलेल्या बैलांची मिरवणूक काढली जाते. ढोल-ताशे, नाच-गाणी यामध्ये लोक सहभागी होतात.

बैल पोळा दिवशी करायचे उपाय
समृद्धी साठी
-पोळ्याच्या दिवशी तांदुळ, गूळ आणि हळद बैलांच्या पुढे ठेवून अर्पण करावे.
-यामुळे घरात, शेतात समृद्धी येते.

शेतीत चांगले उत्पादन साठी
-बैलांच्या शिंगावर हळदीकुंकवाचा टिळा लावून, सात धान्ये ठेवून पूजा करावी.
-यामुळे पिकात किडीपासून संरक्षण होते असे मानले जाते.

गृहकल्याणासाठी
-बैलांना गोड खाऊ घालून नंतर घरातील सर्वांना तोच प्रसाद वाटावा.
-घरातील कलह दूर होऊन शांती राहते.

शत्रुनाशासाठी
-पोळ्याच्या रात्री काळे तीळ आणि काळे उडीद शेताच्या चारही बाजूंना शिंपडले की शत्रूंचे डाव निष्फळ होतात.
-म्हणूनच पोळा हा फक्त सण नाही तर शेती, कुटुंब आणि निसर्गाच्या कल्याणासाठी एक मोठा विधी मानला जातो.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या