जेवणातून 200 जणांना विषबाधा; अनेकांची प्रकृती गंभीर

जेवणातून 200 जणांना विषबाधा; अनेकांची प्रकृती गंभीर

Akola News : हळदीच्या कार्यक्रमातल्या जेवणाने तब्बल 200 जणांना विषबाधा (Food poisoning) झाल्याचा प्रकार घडला आहे. ही घटना अकोला जिल्ह्यातील मवेशा करवंदला गावात घडली असून 59 जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यातील काही रुग्ण बरे झाले असून काही रुग्णांची प्रकृती ठिक नसल्याने त्यांच्यावर उपचार सुरु असल्याचं समोर आलं आहे. तर अनेक रुग्णांची गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे.

‘…तर मी कुठूनही निवडणुकीत उभं राहणार’; अंधारेंनी ठणकावून सांगितलं

जेवणातून विषबाधा होण्याचे प्रकार अनेकदा समोर आले आहेत. अकोला जिल्ह्यातही असाच काहीसा प्रकार घडला आहे. एका हळदीच्या कार्यक्रमानिमित्त अनेकजण उपस्थित झाले होते. हळदीच्या कार्यक्रमात अनेकांनी जेवण केलं. त्यानंतर काही लोकांना अचानक उलट्या आणि जुलाबाचा त्रास होऊ लागला. एकाचवेळी अनेकांना अचानकपणे त्रास होऊ लागल्याने सर्वांनाच रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

Rutuja Bagwe: मराठमोळ्या ऋतुजा बागवेला संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार जाहीर

अकोल्यातील सरकारी रुग्णालयात काही रुग्णांना अॅडमिट करण्यात आलं असून काही रुग्णांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकारानंतर अकोला सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले, जेवणातून विषबाधा झाल्याने दिवसभरात अनेक रुग्ण रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले आहेत. त्यातील काही रुग्णांवर उपचार सुरु असून काही रुग्णालयांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 59 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु असल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज