विजय वडेट्टीवारांच्या गळ्यात विजयाची माळ, इतक्या मतांना केला भाजपच्या उमेदवाराचा पराभव…

  • Written By: Published:
विजय वडेट्टीवारांच्या गळ्यात विजयाची माळ, इतक्या मतांना केला भाजपच्या उमेदवाराचा पराभव…

 

Bramhapuri Assembly Election Results 2024  : आता पुन्हा एकदा राज्यात महायुतीचे (Mahayuti) सरकार येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. कारण, विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election Result) निकालात भाजप-महायुतीने मोठी आघाडी घेतली आहे. एकट्या विदर्भात महायुतीला 50 जागा मिळाल्या आहेत. विदर्भात काँग्रेसचा सुपडा साफ झाला असला तरी विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी आपला गड राखला.

कोल्हापूरात महायुतीची त्सुनामी, महाविकास आघाडीचा क्लीन स्वीप, ‘हे’ आहे कारण 

ब्रह्मपुरी मतदारसंघामधून विजय वड्डेटीवार विरुद्ध भाजपचे कृष्णलाल सहारे अशी थेट लढत होती. या मतदारसंघातून विजय वड्डेटीवर पिछाडीवर असल्याचे सुरुवातीच्या कलात पाहायला मिळाले. मात्र नंतरच्या फेऱ्यात वडेट्टीवार यांनी आघाडी घेतली होती. अखेर ब्रह्मपुरीत भाजपचे कृष्णालाल सहारे पराभूत झाले आहेत. वडेट्टीवार यांना 14 हजार 088 मतांनी सहारे यांचा पराभव केला.

मुख्यमंत्रि‍पदाचे चेहरेच पडले, राज्यात कुठे कुठे धक्कादायक निकाल? 

अंतिम फेरीत वडेट्टीवार यांना 1 लाख 12 हजार 377 मते मिळाली. दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या कृष्णलाल सहारे (भाजप) यांना 98 हजार 289 मते, तिसऱ्या क्रमांवर असलेल्या वंचितच्या राहुल मेश्रामांना 3962, तर केलारराम पारधी (बसपा) यांना 1775 मते मिळाली.

दरम्यान, वडेट्टीवार यांनी जनतेचे आभार मानले. त्यांनी ट्विट करत लिहिलं की, ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस-महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदारांनी मला जे सर्वतोपरी सहकार्य केले त्यांचे मनापासून आभार मानतो.
ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघातील जनतेने माझ्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवत भरभरून प्रेम दिले, साथ दिली, त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार !
हा विजय आपल्या स्वाभिमानी ब्रम्हपुरी, सावली, सिंदेवाही तालुक्यातील मतदारांचा आहे ज्यांनी निवडणूक जाहीर झाल्यापासून ते मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत प्रचार कार्यात सक्रिय सहभाग घेत अहोरात्र परिश्रम घेतले, असं वडेट्टीवार म्हणाले.

महायुतीची 236 जागांवर आघाडीवर
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात महायुतीला जोरदार यश मिळालं आहे
आतापर्यंत महायुती तब्बल 236 जागांवर आघाडीवर आहे. भाजप 137 जागांवर आघाडीवर आहे. तर शिंदे गट 58 जागांवर आघाडीवर आहे. तर अजित पवार यांची राष्ट्रवादी 41 जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळं फडणवीस मुख्यमंत्रिपदी येण्याचा मार्ग मोकळा झाला.

राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालातून असं दिसून येतंय की महाराष्ट्राला 2024 ते 2029 या काळात विरोधी पक्षनेता देखील मिळणार नसल्याची चिन्ह आहेत.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube