पवारांच्या शिलेदाराला धक्का : 430 कोटी थकीत कर्जाप्रकरणी अभिजीत पाटलांसह 21 संचालक अडचणीत
पंढरपूर : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार आणि विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांच्यासह कारखान्याचे 21 संचालक अडचणीत आले आहेत. राज्य सहकारी बँकेचे कर्ज आणि व्याज असे तब्बल 430 कोटी रुपयांचे देणे थकविल्याप्रकरणी पाटील यांच्यासह 21 संचालकांविरोधात पंढरपूर ग्रामीण पोलीस स्थानकात तक्रार नोंदवत या सर्वांवर गुन्हा दाखल करण्याची शिफारस बँकेने केली आहे. (complaint file against Abhijit Patil, chairman of Vitthal Cooperative Sugar Factory, along with 21 directors of the factory)
राज्य सहकारी बँकेचे प्राधिकृत अधिकारी कैलास नामदेव घनवट यांनी बँकेचे प्रशासक यांच्या निर्देशांनुसार ही तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत म्हंटल्याप्रमाणे, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला वेळोवेळी केलेल्या मागणी अर्जानुसार बँकेने ऊस गाळप हंगामासाठी आणि वीज निर्मितीसाठी तसेच इतर जोड उत्पादनांसाठी कर्जमर्यादा मंजूर करुन उच दिलेली आहे. मात्र कर्ज म्हणून घेतलेली रक्कम आणि त्यातून झालेल्या उत्पादनांची रक्कम बँकेत जमा न करता स्वतःच्या वैयक्तिक लाभासाठी या सर्व संचालकांनी वापरली आहे.
पवारांच्या शिलेदाराला धक्का : 430 कोटी थकीत कर्जप्रकरणी अभिजीत पाटलांसह 21 संचालक अडचणीत
कारखान्याने साखरेची, विजेची आणि इतर उत्पादनांची परस्पर विक्री केली आहे. कारखान्याने आणि त्यांच्या संचालकांनी 31 डिसेंबर 2023 अखेर 252.49 कोटी कर्ज आणि 177.68 कोटी इतके व्याज बँकेला भरलेले नाही, ही कृती बँकेची फसवणूक करणारी आहे, असे आरोप करत बँकेचे प्राधिकृत अधिकारी घनवट यांनी भारतीय दंड विधान 1860 मधील कलम 406, 420, 421, 422, 423, 424 व कलम 34 अन्वये फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी शिफारस पंढरपूर ग्रामीण पोलिसांना केली आहे.
‘कुणी काकाचा तर कुणी दुसऱ्याच्या बापाचा पक्ष चोरतोय, हिंमत असेल तर’.. राऊतांचा पवार-शिंदेंवर हल्लाबोल
कारखान्याचे 21 संचालक अडचणीत :
परिणामी कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत धनंजय पाटील, उपाध्यक्षा प्रेमलता बब्रुवान रोंगे, सर्वश्री संचालक संभाजी ज्ञानीचा भोसले, कालीदास रघुनाथ पाटील, दिनकर आदिनाथ चव्हाण, सुरेश बाबा भुसे, बाळासाहेब चिंतामणी हाके, धनंजय उत्तम काळे, साहेबराव श्रीरंग नागने, कालिदास शंकर साळुंखे, सचिन सोपान बाघाटे, जनक माणिक भीसले, प्रविण विक्रम कोळेकर, नवनाथ अंकुश नाईकनवरे, दत्तात्रय विश्वनाथ नरसाळे, सिताराम तायव्या गवळी, अशोक ज्ञानोबा जाधव, सिध्देश्वर शंकर बंडगर, समाधान वसंतराव काळे, कलावती महादेव खटके, सविता विठ्ठल रणदिवे या सर्वांवर गुन्हा दाखल करण्याची शिफारस केली आहे.