सांगलीवरुन आघाडीत बिघाडी? विशाल पाटील अन् विश्वजित कदम ‘नॉट रिचेबल’…

सांगलीवरुन आघाडीत बिघाडी? विशाल पाटील अन् विश्वजित कदम ‘नॉट रिचेबल’…

Sangli Loksabha : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) महाविकास आघाडीच्या जागावाटपाची अंतिम बैठक आज मुंबईत पार पडली. या बैठकीनंतर सांगली (Sangli Loksabha) आणि भिवंडीच्या जागेवरुन काँग्रेसच्या नेत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसरल्याचं दिसून येत आहे. सांगलीच्या जागेसाठी काँग्रेसकडून विशाल पाटील (Vishal Patil) यांना उमेदवारी देण्यासाठी आग्रह धरण्यात आला होता. मात्र, ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता विशाल पाटील बंडखोरी करणार असल्याचं बोललं जातं आहे. सांगलीची जागा शिवसेनेला जाहीर होताच विशाल पाटील आणि विश्वजित कदम नॉट रिचेबल झाले असल्याची माहिती समोर आली आहे.

आमचं काय चुकलं, आता जनतेच्या कोर्टात लढायचं, विशाल पाटील अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात?

महाविकास आघाडीची जागावाटपाची अंतिम बैठक झाली. बैठकीत भिवंडी आणि सांगलीच्या जागेवरुन काँग्रेस नेत्यांकडून वादग्रस्त चर्चा करण्यात आल्याची माहिती आहे. सांगलीच्या जागेमुळे काँग्रेसच्या नेत्यांना मोठा धक्का बसला असून दिल्लीपर्यंत प्रयत्न करुनही हे प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. आता विशाल पाटील आणि विश्वजित कदम नॉट रिचेबल झाले आहेत.

विशाल पाटील आणि कदम दोन्ही नेते महाविकास आघाडीच्या अंतिम बैठकीत होणाऱ्या निर्णयाची वाट पाहत होते. मागील अनेक दिवसांपासून या मतदारसंघातून लढण्यासाठी विशाल पाटील आग्रही होते. एवढे दिवस थांबलोयं, उद्यापर्यंत वाट पाहू पण सांगलीतून लढणारच असल्याचं विधान काल विशाल पाटील यांनी काँग्रेस नेत्यांसोबत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केलं होतं. त्यानंतर ते आजच्या बैठकीनंतर नॉट रिचेबल झाले आहेत.

नार्को टेस्ट केल्यास काँग्रेस नेतेही म्हणतील मोदीच पंतप्रधान होणार; मुनगंटीवारांचा जोरदार हल्ला

महाविकास आघाडीच्या निर्णयानंतर विशाल पाटील समर्थकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. या निर्णयामुळे बाजार समितीचे शशिकांत नागे यांना अश्रू अनावर झाले. तर आमच्यासाठी अत्यंत वाईट दिवस आहे. जाणुनबुजून महाविकास आघाडीतील नेत्यांनी वाईट वागणूक दिली आहे. या निर्णयाचा निषेध करतो. ज्यांनी हा कार्यक्रम केला त्यांचा करेक्ट कार्यक्रम आता आम्ही करणार असल्याची भावना बोलून दाखविली.

सांगली काँग्रेसचीच म्हणणं चुकलं का?
सांगली काँग्रेसचीच, अस म्हणणं चुकलं का?, दादा तुम्ही फक्त लढा, ‘आमचं काय चुकलं? आता लढायचं जनतेच्या कोर्टात’, अशा पोस्ट सोशल मीडियावर पडू लागल्या आहेत. दरम्यान, विशाल पाटील समर्थकांनी सोमवारपासून अर्ज भरण्यासाठी लागणार्‍या कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू केली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज