मुंबई : राज्यात पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीसाठी सर्व पक्षांची जाेरदार तयारी सुरु आहे. नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी डॉ. सुधीर तांबे यांना कॉंग्रेसकडून चौथ्यांदा उमेदवारी जाहीर झाली आहे. काँग्रेसकडून याबाबत पात्र जारी केले आहे. मात्र अद्याप भाजपकडून कोणीही उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही. यामुळे या निवडणुकीची उत्कंठा शिगेला पोहचली आहे. नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी काँग्रेसकडून डॉ. सुधीर तांबे […]
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आठवडाभरापूर्वी त्यांच्या गाडीला अपघात झाला होता. या अपघातामध्ये धनंजय मुंडे यांना दुखापत झाली होती. दरम्यान, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतलीय. या दरम्यान पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीची विचारपूस केलीय. राजकीय हाडवैरी असलेले भाजप […]
नाशिकः विधानपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने ठाकरे गटाला पुन्हा धक्का बसलाय. नाशिकमधील माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या कन्या तनुजा घोलप यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात आज प्रवेश केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार तनुजा या नाशिक पदवीधर मतदारसंघात शिंदे गटाच्या उमेदवार असणार आहेत. विधानपरिषद निवडणुकीत जागा वाटपावरून भाजप आणि शिंदे गटात वाद झाला होता. […]
मुंबई : सत्तासंघर्षाची लढाई सर्वोच्च न्यायालयात सुरु असतानाच आता शिवसेना पक्षप्रमुख पदाचा कार्यकाळ येत्या 23 जानेवारीला संपणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची सलग दुसऱ्यांदा 2018 मध्ये निवड झाली होती. आता शिवसेना पक्षाचा नवा पक्षप्रमुख कोण असणार? याची उत्सुकता शिवसैनिकांसह सर्वांनाच लागलीय. यासंदर्भात शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार अनिल देसाई यांनी भूमिका स्पष्ट केलीय. आमच्या […]
नाशिक : महाराष्ट्र कॉंग्रेस कमिटीचे नेते जयप्रकाश छाजेड यांच्या निधनावर कॉंग्रेसचे प्रदेशाध्याक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिलीय. कामगारांसाठी लढणारा आवाज हरपला, अशा शब्दांत त्यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केला आहे. ते म्हणाले, छाजेड कॉंग्रेसचे निष्ठावान कार्येकर्ते होते. त्यांनी आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत कॉंग्रेसची विचारधारा सोडली नाही. कामगारांच्या न्याय हक्कासाठी सतत झटणाऱ्या जयप्रकाश छाजेड यांच्या निधनाने एक सच्चा […]
सातारा : मुलाच्या प्रेमसंबंधामुळे जात पंचायतीकडून जवळपास 2 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याचा प्रकार सातारा जिल्ह्यातील पुसेगाव इथं घडला आहे. कुटुंबाला दंड ठोठावण्यापासून ते सामाजिक बहिष्कार टाकल्याप्रकरणी जातपंचायतीच्या एकूण 5 जणांवर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. नेमकं प्रकरण काय? साताऱ्यातील पुसेगावतील रहिवासी असलेल्या माधुरी धनु भोसले यांच्या मुलाचं एका महिलेशी प्रेमसंबंध होते. या प्रेमप्रकरणाबद्दल […]