Nitesh Rane : ‘ठाकरे गटात राऊत विरुद्ध आदित्य गँगवॉर, दोघांची ‘नार्को’ करा’; नितेश राणेंचा पलटवार
Nitesh Rane Criticized UBT over Abhishek Ghosalkar Case : माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची मॉरिसने काल गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेचे तीव्र पडसाद राज्याच्या राजकारणतात उमटले आहेत. विरोधकांनी सरकारवर तुफान टीका करत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या प्रकरणी सरकारवर जोरदार टीका होत असताना सरकारच्या बाजूने आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मोर्चा सांभाळला आहे. माजी आमदार विनोद घोसाळकर यांचा मुलगा अभिषेक घोसाळकर यांची हत्या हा उबाठा अंतर्गत सुरू असलेल्या गँगवॉरचा परिणाम आहे, असा आरोप आमदार नितेश राणे यांनी केला आहे.
माजी आमदार विनोद घोसाळकर यांचा मुलगा अभिषेक घोसाळकर यांची हत्या हा उबाठा अंतर्गत सुरू असलेल्या गँगवॉरचा परिणाम आहे. आदित्य विरुद्ध राऊत हे जे काही गँगवॉर उबाठात सुरू आहे आधी फक्त कपडे फाडण्यापर्यंत होतं आता गोळ्या घालण्यापर्यंत येऊन पोहोचलं आहे. अभिषेक हा आदित्यच्या गँगमधला आहे तर मॉरिस आणि राऊतांचा काय संबंध आहे यासाठी त्यांचे सीडीआर तपासले पाहिजेत.
Ajit Pawar : “दोघंही चांगलं बोलत अन् हसत होते, घडलेली घटना अतिशय”.. अजितदादांची पहिली प्रतिक्रिया
ज्या पद्धतीने राऊत तेजसला प्रमोट करत आहे त्यावरून हे गँगवॉर अधिक टोकाचं होत चाललं आहे. त्यामुळे हा जो कोण मॉरिस आहे त्याचे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि संजय राऊतांबरोबर (Sanjay Raut) काय संबंध आहेत याची चौकशी झाली पाहिजे, त्यांचे सीडीआर तपासले पाहिजेत. आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि संजय राऊत यांची नार्को टेस्ट झाली पाहिजे, अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे.
याच गँगवॉरमुळे आता गोळ्या घालण्यापर्यंत वेळ आली आहे. जो मॉरिस राहुल गांधींच्या मुंबईतील यात्रेची तयारी करतोय जो मॉरिस उद्धव ठाकरेंचे बॅनर लावत होता तोच आदित्य ठाकरेच्या निकटवर्तीय घोसाळकरला गोळ्या घालतो. म्हणून दुसरं तिसरं कुणी नाही आमच्या सरकारवर टीका करण्याअगोदर तुमच्यातील गँगवॉर आधी थांबवा, असा इशारा राणे यांनी ठाकरे गटाला दिला.
मोठी बातमी! अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणी दोघे ताब्यात; मुंबई पोलिसांची कारवाई
नेमकं काय घडलं?
अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस हे पूर्वीपासून एकमेकांना ओळखत होते. दोघांमध्ये एक वर्षांपूर्वी वादही झाला होता. दोघांमध्ये वैयक्तिक स्वरुपाचे वादही होते. दोघांमधील वाद मिटल्यानंतर आज दोघेही मॉरिसच्या ऑफिसमध्ये एकत्र आले होते. मॉरिसने स्वतःच्या कार्यालयात त्याने अभिषेक घोसाळकर यांना बोलावलं आणि फेसबुक लाईव्हही केलं. त्यावेळी या दोघांनीही एकमेकांबद्दल कौतुकाचं शब्द वापरल्याचं दिसून येतं आहे. दोघांमध्ये बोलणं झाल्यानंतर अचानक मॉरिसने घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडण्यास सुरुवात केली.