जरांगेंच्या आंदोलनाला मोठा धक्का! मराठा आंदोलकांवर पहिला गुन्हा दाखल, मुंबईत नेमकं काय घडलंय?

जरांगेंच्या आंदोलनाला मोठा धक्का! मराठा आंदोलकांवर पहिला गुन्हा दाखल, मुंबईत नेमकं काय घडलंय?

Mumbai Police File Fir Against Maratha Protesters : मुंबईतील (Mumbai) आझाद मैदानावर गेल्या चार दिवसांपासून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी (Fir Against Maratha Protesters) आंदोलन सुरू आहे. मोठ्या संख्येने मराठा बांधव गाड्या घेऊन मुंबईत दाखल झाले होते. मात्र आझाद मैदानात जागा अपुरी पडल्याने अनेक आंदोलकांना छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT), मंत्रालय, आमदार निवास, बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज, मरीन ड्राईव्ह या परिसरात थांबावे लागले. तर काहींनी नातेवाईकांच्या घरी मुक्काम केला. या दरम्यान आंदोलकांना बस-ट्रेनमधून प्रवास करावा लागत होता. याच प्रवासादरम्यान प्रवासी, आंदोलक यांच्यात शाब्दिक वाद (Mumbai Police) आणि धक्काबुक्की झाल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले.

आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल

यातील एका घटनेवरून मराठा आंदोलकांवर पहिला गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. जुहू परिसरात रविवारी बेस्ट बस प्रवाशांसोबत झालेल्या मारहाणीच्या प्रकरणात अज्ञात आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साक्षीदारांच्या मते, वाद उग्र होऊन हाणामारीपर्यंत गेला आणि आंदोलकांनी बसच्या काचा फोडल्याचा आरोप आहे. याशिवाय सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या आणखी एका व्हिडिओत मुंबई लोकल ट्रेनमध्ये आंदोलक आणि प्रवासी यांच्यात शाब्दिक चकमक झाल्याचे दिसत आहे.

मराठा आरक्षणाचा पेच सुटणार? सरकारच्या गोटात ‘या’ चार पर्यायांची चर्चा, अंतिम तोडगा कोणत्या मार्गाने

मुंबई रिकामे करण्याचे आदेश…

दरम्यान, सोमवारी झालेल्या सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयाने आझाद मैदान वगळता सीएसएमटी, हुतात्मा चौक, मरीन ड्राईव्ह आणि दक्षिण मुंबईतील इतर भाग तातडीने रिकामे करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करून सीएसएमटी व हुतात्मा चौक परिसर रिकामा केला असून वाहतूक पुन्हा पूर्ववत झाली आहे. आझाद मैदानात आता मोठा मंडप उभारला जात असून सुमारे 3 हजार लोकांना थांबवण्याची सोय केली जात आहे.

ब्रेकिंग! आझाद मैदान तातडीने रिकामं करा, मुंबई पोलिसांची मनोज जरांगेंना नोटीस, आंदोलनाला परवानगी नाकारली

जरांगे पाटलांना पोलिसांची नोटीस

न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांच्या कोअर कमिटीला नोटीस बजावली आहे. आंदोलन करताना न्यायालय आणि पोलिसांनी घालून दिलेल्या अटींचं उल्लंघन केल्याचा उल्लेख या नोटीसमध्ये आहे. यामुळे जरांगे पाटलांनी मागितलेल्या पुढील आंदोलनाच्या परवानग्या नाकारण्यात आल्या आहेत. तसेच जरांगे पाटलांनी माध्यमांमध्ये केलेल्या काही विधानांचीही पोलिसांनी नोंद घेतली असून ती नोटीसमध्ये नमूद केली आहेत.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube