Raj Thackeray: शिंदे-फडणवीस म्हणत होते म्हणून…, अमित शाहंच्या भेटीबद्दल राज ठाकरेंनी स्पष्टचं सांगितलं

Raj Thackeray: शिंदे-फडणवीस म्हणत होते म्हणून…, अमित शाहंच्या भेटीबद्दल राज ठाकरेंनी स्पष्टचं सांगितलं

Raj Thackeray Explain on Amit Shah Meeting : शिवतीर्थावरील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ( MNS ) गुढी पाडवा मेळाव्यात राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांनी आपली राजकीय भूमिका जाहीर केलीय. तसेच यावेळी राज ठाकरे यांनी अमित शाहं ( Amit Shah ) यांच्यासोबत भेट का घेतली? यावर देखील स्पष्टीकरण दिलं ते म्हणाले की, शिंदे-फडणवीस एकत्र यायचं म्हणत होते. मग मी शाहंनाच भेटून त्याबाबत विचारलं.

Lok Sabha नरेंद्र मोदींसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा; राज ठाकरेंकडून मोठी घोषणा !

राज ठाकरे म्हणाले की, मला अनेक लोक घरी येऊन भेटतात. कुणाचीही भेट घेण्यात गैर काय आहे? त्यात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील वर्ष-दीड वर्ष पासून माझ्याशी बोलत आहेत. ते म्हणत आहेत की, आपण एकत्र आलं पाहिजे आपण एकत्र काहीतरी केलं पाहिजे. तसेच देवेंद्र फडणवीस देखील मला म्हणत होते की, आपण एकत्र आले पाहिजे मग मी त्यांना विचारलं एकत्र आलं पाहिजे म्हणजे काय? हे विषय वारंवार होत असल्याने मी भाजपचे वरिष्ठ नेते आणि गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेण्याचे ठरवले.

शिवसेनेचा नाही तर मी मनसेचाच अध्यक्ष राहणार; राज ठाकरेंनी ठासूनच सांगितलं

राज्यातील देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचे नेमकं म्हणणं काय आहे? हे जाणून घेण्यासाठी मी अमित शाह यांना भेटलो. दिल्लीत अमित शाह यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर राज्यात आल्यानंतर शिंदे फडणवीसांसोबत ही माझी चर्चा झाली. त्या भेटीनंतर माझ्यावर मग आता त्या लाव रे त्या व्हिडिओचं काय होणार असं म्हणत माझ्या भूमिकेवरून टीका देखील करण्यात आली.

तसेच राज ठाकरे पुढे म्हणाले की, बाळासाहेबांसोबत शिवसेनेत असताना माझे भाजप नेत्यांशी चांगले संबंध होते. त्यामुळे अशा प्रकारच्या भेटी होत असतात. याच भेटी काँग्रेस नेत्यांसोबतही होत होत्या. मात्र युतीच्या निमित्ताने भाजपच्या लोकांशी भेटी आणि गाठी दोन्ही होत होत्या. यामध्ये महाजन, मुंडे गडकरी त्याचबरोबर गुजरात दौरा केला. त्यावेळी नरेंद्र मोदी यांच्यासोबतही चांगले संबंध आले. एक वेळ अशी आली की, या देशात राज ठाकरे हा पहिला माणूस होता. ज्याने नरेंद्र मोदी यांनी देशाचे पंतप्रधान व्हावेत. असं म्हटलं होतं भाजपने त्यांनी देखील तोपर्यंत याबाबत काहीही बोललेलं नव्हतं. असं म्हणत राज यांनी आपल्या भाजपच्या संबंधांवर प्रकाश टाकला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube