असं जागावाटप जगाच्या राजकारणात कुठेही होत नाही, आंबेडकरांच्या ‘त्या’मागणीवर राऊत नाराज
Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी प्रकाश आंबेडकर ( Prakash Ambedkar ) यांच्या मागणीवर नाराजी व्यक्त केली आहे. संजय राऊत म्हणाले की, प्रकाश आंबेडकर यांना अपेक्षित असलेले जागावाटप जगाच्या राजकारणात कुठेही होत नाही. दरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यासह मल्लिकार्जुन खरगेंना मागणी केली की, दोन दिवसांत जागावाटपावर निर्णय घ्या.
“मी कामाचा माणूस, खासदार निवडून द्या, पुढे जबाबदारी माझी”; इंदापुरात अजितदादांची जोरदार बॅटिंग
त्यावर संजय राऊत म्हणाले की, प्रकाश आंबेडकर आणि त्यांचा वंचित बहुजन आघाडी हा महाविकास आघाडीचा घटक आहे. महाविकास आघाडीचा घटक करून घ्या, अशी त्यांची मागणी आहे. त्यांच्या विनंतीस मान देऊन वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत समाविष्ट करून घेतली, त्यामुळे महाविकास आघाडीच्या बैठकांमधून ते सामील होतात. या देशात संविधान वाचविण्याची आघाडी सुरू आहे.
Chhagan Bhujbal : “लहान पक्षही मोठे होतात” छगन भुजबळांचा बावनकुळेंना खोचक टोला
उत्तर प्रदेश मध्ये मायावतींचे सरकार वेगळ आहे, त्यांना अप्रत्यक्षरीत्या भाजपाला मदत करायची आहे. मला असं वाटतं आंबेडकर त्यांच्या बाजूने जाणार नाहीत. वंचित बहुजन आघाडीचा पूर्ण सन्मान आम्ही ठेवलेला आहे. त्यांच्या काही भूमिका जाहीरपणे ते मांडत असतील, तो त्यांचा वेगळा प्रश्न आहे. 27 तारखेला महाविकास आघाडीची बैठक आहे.
त्या बैठकीला आम्ही वंचित बहुजन आघाडीला आमंत्रित केलं आहे आणि त्यांनी येण्याच मान्य केले आहे. जागा वाटपाची चर्चा एकत्र होईल. त्यांना अपेक्षित असलेलं जागावाटप जगाच्या राजकारणात कुठेही होत नाही. त्यांना कुठल्या जागा हव्यात? ते त्यांना द्यायला आम्ही तयार आहोत. ते त्यांना माहित आहे पण त्यांच्याकडून एखादी भूमिका येत असेल तर त्यावर चर्चा करू, वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीतील एक घटक आहे. असं राऊत म्हणाले आहेत.