जामीनासाठी केजरीवालांची भन्नाट शक्कल; शुगर लेव्हल वाढवण्यासाठी खातायेत आंबे अन् आलू पुरी
Arvind Kejriwal : सध्या लोकसभा निवडणुकीचं (Loksabha Election) वारं वाहत आहे. अशातच दिल्लीत आम आदमी पक्षानेही लोकसभेच्या निवडणुकीत उडी घेतली आहे. मात्र, आपचे अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) दारु घोटाळ्याप्रकरणी सध्या तिहार जेलमध्ये आहेत. अद्याप केजरीवालांना या प्रकरणी जामीन मिळाला नसून जामिनासाठी त्यांच्याकडून भन्नाट शक्कल लढवण्यात येत आहे. तुरुंगात असताना शुगर लेव्हल वाढवण्यासाठी केजरीवाल मिठाई, आलूपुरी, आणि आंबे खात असल्याचा दावा ईडीकडून (ED) न्यायालयात करण्यात आला आहे.
Shekhar Kapoor अन् डेव्ह स्टीवर्टचा फोटो व्हायरल; दोघे एकत्र काम करणार प्रेक्षकांची उत्कंठा वाढली
जामीन मिळण्यासाठी अरविंद केजरीवाल आपल्या खाण्यापिण्याच्या गोष्टींमध्ये अधिक गोड पदार्थ खात असल्याचं ईडीकडून सांगण्यात आलं आहे. केजरीवाल यांना टाईप 2 डायबेटीज आहे. अशात ते बटाटा, आंबे मिठाई यांच्यासारख्या गोड पदार्थांचं सेवन करीत आहेत. शरीरातील शुगर वाढल्यास वैद्यकीय कारणासाठी केजरीवाल यांना जामीन मिळू शकतो, त्यामुळेच ते गोड पदार्थांचं सेवन करीत असल्याचं ईडीकडून न्यायालयात सांगण्यात आलं आहे. ईडीच्या आरोपानंतर न्यायालयाने आता केजरीवालांचा डाएट चार्टही मागवला आहे.
‘अजितदादांनी पवारांचं बोट सोडलंय, तेव्हा भाकरी बरोबर फिरवा’; CM शिंदेंचा बारामतीकरांना खास मेसेज
अरविंद केजरीवाल यांना घरचे जेवण देण्याची परवानगी न्यायालयाकडून देण्यात आलेली आहे. यासोबतच तुरुंग प्रशासनाने केजरीवाल यांचा डाएट प्लॅन दिला आहे. या डाएट प्लॅनमध्ये केजरीवाल दैनंदिन कोणत्या पदार्थांचं सेवन करीत आहेत, याचा स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला आहे., केजरीवाल प्रमाणापेक्षा अधिक प्रमाणात आंबे, मिठाई, बटाटे खात असल्याचं ईडीकडून सांगण्यात आलं आहे.
श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांवर किती कर्ज?; उमेदवारी अर्जातून समोर आली एकूण संपत्ती
दरम्यान, ईडीने अरविंद केजरीवाल यांच्यावर केलेल्या आरोपांनंतर आता न्यायालयाने तुरुंग प्रशासनाला अरविंद केजरीवाल यांचा डाएट प्लॅन मागवला आहे. या प्रकरणावर न्यायालयात पुढील सुनावणी शुक्रवारी होणार आहे.