‘लिपस्टिक’चं इकॉनॉमी कनेक्शन काय? बजेटवर कसा होतो परिणाम? जाणून घ्याच!

‘लिपस्टिक’चं इकॉनॉमी कनेक्शन काय? बजेटवर कसा होतो परिणाम? जाणून घ्याच!

Budget 2025 : लिपस्टिक खूप स्वस्त असते. एक लिपस्टिक खरेदी करायची झाली त्याची किंमत 250 ते 1000 रुपयांपर्यंत आहे. पण लिपस्टिक सारख्या एखाद्या लहान वस्तुवरूनही तुम्ही त्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा अंदाज बांधू शकता. कसा तर जाणून घेऊ या सोप्या भाषेत..

आज देशाचा अर्थसंकल्प सादर होत आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने हा एक मोठा इव्हेंट आहे. याच अर्थव्यवस्थेचे एक कनेक्शन महिलांच्या लिपस्टिकशी सुद्धा जोडलेले आहे. याची माहिती बहुतेकांना नसेल. जगभरात लिपस्टिकच्या खरेदीच्या पॅटर्नवर एक इंडेक्स तयार केला जातो. हा इंडेक्स त्या देशाच्या अर्थव्यवस्थेची परिस्थिती कशी आहे याचे संकेत देतो.

मोदी सरकारचा ३.० चा आज पहिला पूर्ण अर्थसंकल्प; अर्थमंत्री निर्मला सीतारमण करणार नवा विक्रम

ज्यावेळी देशावर आर्थिक संकट येतं त्यावेळी महिलांच्या सौंदर्य प्रसाधनांवरील खर्च कमी होतो. पण ज्यावेळी लिपस्टिकची विक्री वाढते आणि लक्झरी ब्यूटी प्रॉडक्ट्सची विक्री कमी होते त्यावेळी त्या देशाच्या आर्थिक संकटाचा संकेत मिळतो.

लिपस्टिकच्या विक्रीचं गणित समजून घ्यायचं असेल तर L’Oreal, Estee Lauder, Sugar, mamaearth, Ultra Beauty या कंपन्यांची माहिती घेऊ शकता. मागील वर्षात या कंपन्यांच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली. जर तुम्ही दहा अर्थशास्त्रातील तज्ज्ञांना विचारलं तर कदाचित तुम्हाला वेगवेगळे उत्तरं मिळतील. यामुळे जीडीपी, रोजगार यांवर काही लोक कमी लक्ष देत आहेत. हे लोक आता वेगळ्या प्रकारच्या आर्थिक सांकेतांकांवर लक्ष केंद्रीत करत आहेत. ज्यावेळी लिपस्टिकची विक्री वाढते आणि अन्य लग्जरी ब्यूटी प्रॉडक्ट्सची विक्री घटते अशा वेळी तो देश आर्थिक संकटात आहे असा अंदाज तुम्ही नक्कीच बांधू शकता.

आर्थिक सर्वेक्षण सादर

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शुक्रवारी लोकसभेत 2024-25 या आर्थिक वर्षाचा आर्थिक आढावा सादर केला. हे चालू आर्थिक वर्षातील अर्थव्यवस्थेच्या कामगिरीचे मूल्यांकन करते आणि देशासमोरील आव्हानांचे वर्णन करते. आर्थिक सर्वेक्षण हा केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी अर्थव्यवस्थेच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी सरकारकडून सादर केलेला वार्षिक दस्तऐवज आहे. हे सुधारणा आणि विकासासाठी एक ब्लूप्रिंट देखील प्रदान करते.

बजेटआधी गुडन्यूज! LPG सिलिंडरच्या दरात मोठा बदल; किती रुपयांनी स्वस्त

follow us
  • fb
  • instagram
  • youtube