दिल्लीच्या मैदानात वारसदारांची अग्निपरीक्षा; माजी पीएम अन् सीएमचे कुटुंबीय रिंगणात..

दिल्लीच्या मैदानात वारसदारांची अग्निपरीक्षा; माजी पीएम अन् सीएमचे कुटुंबीय रिंगणात..

Delhi Elections 2025 : दिल्ली विधानसभा निवडणुकीची (Delhi Elections 2025) घोषणा झाल्यानंतर राजकीय पक्षांनी आपले पत्ते उघडण्यास सुरूवात केली आहे. राजकीय वारसा घेऊन राजकारणात आलेल्या अनेक नेत्यांची परीक्षा या निवडणुकीत होणार आहे. माजी पंतप्रधानांचे नातू तसेच दिल्लीच्या तीन माजी मुख्यमंत्र्यांचे मुलं नशीब आजमावत आहे. तसेच डझनभर मतदारसंघांत आमदारांच्या कुटुंबातील सदस्य लढत आहेत. अशा प्रकारे रिंगणातील या उमेदवारांना आपल्या परिवाराचा राजकीय वारसा टिकविण्याच आव्हान आहे.

माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचे नातू आदर्श शास्त्री द्वारका मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. या व्यतिरिक्त तीन माजी मुख्यमंत्र्यांची मुलं मैदानात आहेत. माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे पुत्र संदीप दीक्षित, साहिब सिंह वर्मा यांचे पुत्र प्रवेश वर्मा आणि मदनलाल खुराणा यांचे पुत्र हरीश खुराणा रिंगणात आहेत. दिल्ली सरकारमधील माजी मंत्री आणि खासदरांचे मुले सुद्धा निवडणुकीत आहेत.

द्वारका मतदारसंघातून काँग्रेसने माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचे नातू आदर्श शास्त्री यांना तिकीट दिले आहे. 2015 मध्ये आदर्श शास्त्री आम आदमी पार्टीचे आमदार होते. आपने या याठिकाणी माजी खासदार महाबल मिश्रा यांचे पुत्र आणि विद्यमान आमदार विनय मिश्रा यांना संधी दिली आहे. तर भाजपने प्रद्युम्न राजपूत यांना तिकीट दिले आहे. तिन्ही उमेदवार तुल्यबळ असल्याने निवडणूक अटीतटीची होणार असे दिसत आहे.

आठ महिन्यांचं पॉलिटिक्स! इंडिया आघाडीला तडे; काँग्रेसची कोंडी अन् मित्र दुरावले

तीन माजी मुख्यमंत्र्यांचे मुलं कशी फसली

या निवडणुकीत दिल्लीच्या तीन माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलांची अग्नीपरिक्षा होणार आहे. नवी दिल्ली मतदारसंघात सर्वात हाय होल्टेज लढत होणार आहे. येथे स्वतः अरविंद केजरीवाल मैदानात आहेत. त्यांच्या विरोधात भाजपने प्रवेश वर्मा यांना तर काँग्रेसने माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे पुत्र संदीप दीक्षित यांना तिकीट उतरवल आहे. भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्षांचे हे उमेदवार खासदार राहिले आहेत.

माजी मुख्यमंत्री मदनलाल खुराणा यांचे पुत्र हरीश खुराणा यांना भाजपने मोतीनगर मधून तिकीट दिलं आहे. त्यांच्या विरोधात आपचे शिवचरण गोयल आणि काँग्रेसचे राजेंद्र रामधारी मैदानात आहेत. या मतदारसंघात हरीश खुराणा यांचे वडील मदनलाल खुराणा दोन वेळा आमदार राहिले आहे.

वडिलांचा वारसा टिकवण्याचं आव्हान

दिल्लीच्या मैदानात अर्धा डझनपेक्षा जास्त मतदारसंघांत दिग्गज नेत्यांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांना तिकीट मिळवून दिलं आहे. कृष्णानगर मधून आपने विद्यमान आमदार एसके बग्गा यांच्याऐवजी विकास बग्गा यांना संधी दिली आहे. चांदनी चौकमधून आमदार प्रल्हाद साहनी यांचे पुत्र पुरुनदीप साहनी नशीब आजमावत आहेत. काँग्रेसने याच मतदारसंघात माजी खासदार जेपी अग्रवाल यांचे पुत्र मुदित अग्रवाल यांना तिकीट दिलं आहे.

काँग्रेसला धक्का! दिल्लीत उद्धव ठाकरेंचा ‘आप’ला पाठिंबा; इंडिया आघाडीला तडे?

मटिया महल मतदारसंघात शोएब इकबाल यांच्याऐवजी त्यांच्या मुलाला आम आदमी पार्टीने तिकीट दिलं आहे. सीलमपूरमध्ये आमदार मतीन अहमद यांचे पुत्र जुबैर अहमद रिंगणात आहेत. मुस्तफाबादमध्ये काँग्रेस नेते हसन अहमद यांचे पुत्र अली मेहंदी यांना तिकीट मिळालं आहे. उत्तमनगरमधूम आप आमदार नरेश बाल्यान यांची पत्नी पोश बाल्यान यांना संधी मिळाली आहे. दिल्ली सरकारमधील माजी मंत्री मंगत राम सिंघल यांचे नातू शिवांक सिंघला यांना आदर्शनगर मतदारसंघातून काँग्रेसने तिकीट दिले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube