राष्ट्र प्रथम! इक्सिगोचा चीन अन् तुर्कीला दणका; फ्लाइट, हॉटेल बुकिंग थांबवलं

राष्ट्र प्रथम! इक्सिगोचा चीन अन् तुर्कीला दणका; फ्लाइट, हॉटेल बुकिंग थांबवलं

India Pakistan Tension : इंडियन ट्रॅव्हल प्लॅटफॉर्म इक्सिगोने तुर्की, अजरबैजान आणि चीनसाठी विमान उड्डाणे आणि हॉटेल बुकिंग थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. भारत पाकिस्तान संघर्षात (India Pakistan Tension) या देशांनी पाकिस्तानला पाठिंबा दिला आहे. याचाच निषेध करत इक्सिगोने हा निर्णय घेतला आहे. याबाबत कंपनीने एक्सवर एक पोस्ट केली आहे. देशाबरोबर एकजुटीने उभे राहत आम्ही तुर्की, अजरबैजान आणि चीनसाठी फ्लाइट बुकिंग, हॉटेल बुकिंग थांबवले आहे असे या पोस्टमध्ये म्हटले आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्ध आता थांबलं आहे. युद्धविराम लागू झाला आहे. याआधी तुर्की आणि अजरबैजानच्या परराष्ट्र मंत्रालयांनी भारताच्या पाकिस्तानवरील कारवाईवर टीका केली होती. पाकिस्तानच्या नागरिक क्षेत्रांवर हल्ला झाल्याचा दाव्याला या देशांनी समर्थन दिलं होतं. त्यामुळे कंपनीने या देशांना धडा शिकवण्याचा निर्णय घेतला. या दोन्ही देशांबरोबरच चीनसाठीही विमान आणि हॉटेल बुकिंग थांबवले आहे. दरम्यान, याआधी EasyMyTrip, पिकयोरट्रेल सहीत अन्य ट्रॅव्हल ऑपरेटर्स आणि स्टार्टअप्सनेही अजरबैजान आणि तुर्कीच्या सर्व पॅकेजेस रद्द केले होते.

आता गोळी नाही गोळा चालणार : PM मोदी

भारत-पाकिस्तानमध्ये सलग 86 तास युद्ध चालल्यानंतर (India–Pakisatan War) अखेर युद्धबंदीची घोषणा करण्यात आलीयं. या घोषणेनंतरही पाकिस्तानकडून अद्यापही कुरापती सुरुच असल्याचं चित्र पाहाला मिळत आहे. अशातच आता भारताकडून एक मोठी घोषणा करण्यात आलीयं. पाकिस्तानातून जर गोळी चालली तर भारतातून गोळे चालणार असल्याचं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला ललकारलंय. मागील आठवडाभरातील तिसरी उच्चस्तरीय बैठक आज पार पडली. या बैठकीनंतर पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला ललकारलंय.

पाकिस्तान जर दहशतवाद्यांना आमच्या ताब्यात देणार असतील तर आम्ही पुढील चर्चा करण्यास तयार आहे. आम्ही दुसऱ्या कोणत्याही विषयावर चर्चा करण्यास तयार नाही. आम्हाला कोणाच्याही मध्यस्थीची गरज नसल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट केलंय. एएनआय वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे.डी. वेंस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भारत-पाकिस्तान युद्धासंदर्भात चर्चा झालीयं. या चर्चेत पंतप्रधान मोदींनी वेंस यांना आपली भूमिका समजावून सांगितली आहे. जर पाकिस्तान काही कुरापती करीत असेल तर भारत त्यांना चोख प्रत्युत्तर देईल.

आता गोळी नाही तर भारताकडून गोळा चालणार; POK टार्गेट अन् मोदींनी ललकारलं…

follow us
  • fb
  • instagram
  • youtube