निवडणुकीत भाजपचं नुकसान का झालं? प्रशांत किशोर म्हणाले, 400 पारच्या घोषणेनं…

निवडणुकीत भाजपचं नुकसान का झालं? प्रशांत किशोर म्हणाले, 400 पारच्या घोषणेनं…

Prashant Kishor : लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा दणका बसला. चारशे पारचा नारा देणाऱ्या भाजपला साधं बहुमतही मिळालं नाही. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, राजस्थान, बिहार या राज्यात भाजपाच्या जागा मोठ्या प्रमाणात कमी झाल्या. आता भाजपाच्या या पराभवाची कारणं शोधली जात आहेत. भाजपाच्या प्रचंड विजयाचं भाकित करणाऱ्या निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी भाजपाचा पराभव का झाला याचं उत्तर दिलं आहे. चारशे पारचा नारा ज्यानं कुणी लिहिला तो अर्धवट होता. हा नारा कशासाठी देत आहोत याचं कारण त्यांना सांगायला हवं होतं. शिवाय या घोषणेतून अहंकाराचा वास येत होता. या चारशे पारच्या घोषणेनच भाजपाचं सर्वाधिक नुकसान झालं, असं मत प्रशांत किशोर यांनी व्यक्त केलं.

400 चा आकडा गाठला नाही तरी… भाजपच्या जागांबाबत प्रशांत किशोर यांचा मोठा दावा   

यंदाच्या निवडणुकीत भाजपची मोठी पिछेहाट झाली आहे. भाजपाच्या 63 जागा कमी झाल्या आहेत. त्यामुळे बहुमत दूरच राहिले फक्त 240 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. एनडीए आघाडीचं बहुमत मात्र झालं आहे. आघाडीतील घटक पक्षांनी समर्थनाचं पत्रही देऊन टाकलं आहे. अशा पद्धतीने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एनडीए सरकार स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

भाजपला या पक्षांची मदत आता घ्यावी लागत आहे याचं सर्वात मोठं कारण म्हणजे ज्या राज्यांबाबत भाजपला संशय नव्हता त्याच राज्यांनी झटका दिला. राजस्थानात दहा जागा घटल्या. बंगालमध्ये सहा जागा कमी झाल्या. बिहारमध्येही मोठा फटका बसला. महाराष्ट्रात जवळपास 14 जागा कमी झाल्या. उत्तर प्रदेशात तीस पेक्षा जास्त जागा कमी झाल्या. कर्नाटकातही आठ जागा घटल्या. ओडिशा आणि दक्षिणेतील तेलंगाणा, केरळ, आंध्र प्रदेशात काही जागा मिळाल्या. परंतु, मोठ्या राज्यातील फटका मोठा होता. त्यामुळे स्वबळावर सत्तेत येण्याचं भाजपचं स्वप्न भंगलं.

भाजपला तीनशे पेक्षा जास्त जागा मिळतील असा दावा प्रशांत किशोर यांनी केली होता. त्यांचा हा दावाही खोटा असल्याचे सिद्ध झाले आहे. प्रशांत किशोर म्हणाले, ज्यानं कुणी चारशे पारचा नारा लिहिला तो चुकीचा नव्हता तर अर्धवट होता. हा नारा कशासाठी दिला जातोय हेही सांगणं गरजेचं होतं. आधीच्या निवडणुकीत नारे दिले होते पण त्याचं कारणही स्पष्ट केलं होतं. यावेळी तसं झालं नाही.

Video : चार वेळा वदवून सांगितलं सोबत राहू; ‘पलटू पंटर’ नितीश कुमारांनी गाजवली NDA ची बैठक

चारशे पारचा नारा अहंकारातून दिला जात असल्याचं वाटलं. तसेच विरोधकांनीही संविधान बदलण्यासाठीच चारशे पारचा नारा दिला जात असल्याचं लोकांच्या मनावर बिंबवलं. या घोषणेमुळंच भाजपला सर्व जागांवर मोठं नुकसान सहन करावं लागलं आहे, असे प्रशांत किशोर यांनी स्पष्ट केले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube