आम आदमी पक्षाला का सोडलं?…, खासदार राघव चड्ढांनी सांगितले ‘तीन’ मुद्दे

गेल्या काही दिवसांपासून अनेक लोक त्यांना शुभेच्छा देत आहेत, तर काही जण त्यांच्या या निर्णयामागचं खरं कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

News Photo   2026 04 27T153229.553

राघव चड्ढा यांनी आम आदमी पार्टीला (AAP) मोठा धक्का देत पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता त्यांनी आपल्या भूमिकेचं सविस्तर स्पष्टीकरण दिलं आहे. राघव चड्ढा आता अधिकृतपणे भारतीय जनता पक्षात सामील झाले असून त्यांच्या सोबत आणखी सहा खासदारांनीही भाजपमध्ये पक्षप्रवेश केला आहे.

एका व्हिडिओत राघव चड्ढा यांनी आपल्या निर्णयामागची कारणं सांगितली आहेत. ते म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून अनेक लोक त्यांना शुभेच्छा देत आहेत, तर काही जण त्यांच्या या निर्णयामागचं खरं कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळेच त्यांनी थेट जनतेसमोर येऊन आपली बाजू स्पष्ट करण्याचा निर्णय घेतला.

Gen Z Unfollow चा जबरदस्त फटका; राघव चड्ढा यांचे इंस्टाग्राम फॉलोअर्स 1.46 कोटींवरून 1.35 कोटींवर

राघव चड्ढा म्हणाले की, गेल्या काही वर्षांत मला सतत असं जाणवत होतं की पक्ष आपल्या मूळ विचारांपासून दूर गेला आहे. पक्ष आता सामान्य लोकांच्या प्रश्नांसाठी नव्हे, तर काही व्यक्तींच्या वैयक्तिक फायद्यासाठी काम करत असल्याचं मला जाणवत होतं. त्याचबरोबर एकजण चूक असू शकतो सातजण कसे चूक असतील असं म्हणत त्यांनी आप’ला पुन्हा डिवचलं आहे.

त्यांनी सांगितलं की त्यांच्या समोर तीन पर्याय होते. पहिला म्हणजे राजकारण पूर्णपणे सोडून देणं. दुसरा म्हणजे पक्षात राहून परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करणं. आणि तिसरा पर्याय म्हणजे आपल्या अनुभव आणि उर्जेच्या जोरावर दुसऱ्या पक्षात जाऊन सकारात्मक राजकारण करणं. अखेर त्यांनी तिसरा पर्याय निवडल्याचं स्पष्ट केलं.

follow us