रायपूर : काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन (Congress session) आजपासून रायपूरमध्ये सुरू झाले असून शुक्रवारच्या पहिल्या सत्रामध्ये पक्षासाठी कळीच्या ठरलेल्या कार्यकारिणी समितीच्या निवडणुकीवर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. या मुद्द्यावरून काँग्रेसमध्ये मतभेद असून पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) आणि सुकाणू समितीतील अन्य सदस्यांनी दबावाविना निर्णय घ्यावा, असे राहुल गांधींचे म्हणणे आहे. सोनिया गांधी (Sonia Gandhi), राहुल गांधी […]
देशाच्या माजी पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील ( Pratibha Patil ) यांचे पती देवीसिंह शेखावत ( Devisingh Shekhawat) यांचे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर पुण्याच्या केईएम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. देवीसिंह शेखावत गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांना ह्रदयविकाराचा झटका […]
पंजाबच्या ( Punjab ) अमृतसरमधील ( Amrutsar ) अजनाला या पोलिस स्टेशनवर गुरुवारी खलिस्तानवादी समर्थकांनी ( Khalisthani Attack ) हल्ला केला आहे. वारीस पंजाब दे या संघटनेच्या समर्थकांनी हा हल्ला केला आहे. वारीस पंजाब दे संघटनेचा प्रमुख अमृतपालसिंह याच्याशी संबंधित व्यक्ती लवप्रीतसिंह तुफान याला पोलिसांनी अटक केली होती. त्याला सोडवण्यासाठी हा हल्ला करण्यात आला. लवप्रीतसिंह […]
नवी दिल्ली : 24 जानेवारीनंतर सुरू झालेला अदानी समूहाच्या शेअर्समधील घसरणीचा ट्रेंड 1 महिन्यानंतरही कायम आहे. आज म्हणजेच 23 फेब्रुवारी रोजी अदानी समूहाचे बहुतांश शेअर्स घसरले आहे, अनेक शेअर्स लोअर सर्किट आहेत. या घसरणीत अदानी समूहाच्या शेअर्सचे एकत्रित मार्केट कॅप $98 अब्जच्या खाली आले आहे. यामुळे अदानीची स्वतःची संपत्तीही सातत्याने कमी होत आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर […]
कलकत्ता : आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनी असलेल्या बीबीसीनं २००२ साली गुजरातमध्ये झालेल्या धार्मिक दंगलीवर ‘इंडिया- द मोदी क्वेशन’ (‘India – The Modi Question’) नावाचा माहितीपट प्रदर्शित केल्यानंतर त्यावरून वाद पेटलेला होता. त्यानंतर जवाहरलाल नेहरू विद्यापीठ अर्थात जेएनयूमध्ये बीसीसीने प्रदर्शित केलेल्या पंतप्रधान पीएम मोदी तसेच गुजरात दंगलीवरील माहितीपटाचं विशेष स्क्रीनिंग प्रयत्न करण्याचा करण्यात आला होता. आता पश्चिम बंगालच्या […]
शिलाँग : केंद्रातील मोदी सरकारमधील (Modi Govt) मंत्री आणि अनेक भाजप नेते गोमांसच्या (Beef) विक्री आणि वाहतूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत असतात. अनेक भाजपशासित राज्यांमध्ये गोवंश हत्याबंदी कायदाही लागू करण्यात आलेला आहे. परंतु आता मेघालयचे भाजप प्रदेशाध्यक्ष एर्नेस्ट मावरी (Ernest Mowry) यांनी मोठं विधान केलं आहे. होय, मी बीफ खातो. आम्हाला बीफ खाण्यापासून […]