नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)आपल्या कपड्यांवरुन कायमच चर्चेत असतात. आज पुन्हा एकदा मोदींनी घातलेल्या निळ्या रंगाच्या जॅकेटमुळं (Blue Jacket)ते चर्चेत आले आहेत. त्याचं कारणही तसंच आहे, हे जॅकेट कापडाचं नसून रिसायकल केलेल्या प्लास्टिकच्या बाटलीपासून (Recycle Plastic Bottle)तयार केलेलं आहे. आज बुधवारी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्ताव मांडण्यासाठी पंतप्रधान मोदी संसदेत पोहोचले. […]
नवी दिल्ली : सध्या अदानी समूहाबाबत (Adani Group) राष्ट्रपतींच्या (President) अभिभाषणावरून संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ सुरू आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी आपल्या भाषणात उपराष्ट्रपतींबद्दल (Vice President Jagdeep Dhankhar) केलेल्या दाव्याने मोठा हास्यकल्लोळ उडाला. मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, ”लोकतांत्रिक संस्थांवर हल्ले होत आहेत. उपराष्ट्रपतींना उद्देशून, तुम्ही तर संविधानाचे जाणकार आहात. प्रसिद्ध वकील आहात. तुम्ही […]
नवी दिल्ली : सध्या संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget session) सुरू आहे. दरम्यान AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी लोकसभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्यावर जोरदार टीका केली. (Modi Govt) संसदेत बोलताना हैदराबादचे खासदार ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी अनेक प्रश्न मांडताना सरकारला हिरव्या रंगाची इतकी अडचण का ? मोदी सरकार तिरंग्यातून हिरवा रंग काढू […]
मुंबई : देशातील महागाईचा दर खाली आल्यानंतरही रिझर्व्ह बँकेने (RBI) सलग सहाव्यांदा रेपो रेट वाढवण्याची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर रेपो रेट 6.25% वरून 6.50% झाला आहे. त्यामुळे घर कर्जापासून ते वाहन आणि वैयक्तिक कर्जापर्यंत सर्व काही महाग होईल. परिणामी सर्वसामान्य लोकांना जास्त ईएमआय भरावा लागेल. देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर आरबीआय एमपीसीची ही बैठक […]
नवी दिल्ली : भारतीय नौदलाने (Indian Navy) ‘आत्मनिर्भर भारत’च्या दिशेने एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. नौदलाच्या वैमानिकांनी आयएनएस विक्रांतवर (INS Vikrant) लढाऊ विमान (LCA) लँडिंग केले आहे. स्वदेशी लढाऊ विमाने आणि स्वदेशी विमानवाहू विमाने त्यांची रचना, बांधणी आणि ऑपरेट करण्याची भारताची क्षमता दर्शवतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबरमध्ये भारतातील पहिली स्वदेशी बनावटीची विमानवाहू वाहक आयएनएस […]
नवी दिल्ली : आज सुप्रीम कोर्टात (Supreme Court) महानगरपालिका (Municipal Corporation) आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (Panchayat Raj) निवडणुकीसंदर्भात सुनावणी होणार होती. सुप्रीम कोर्टाच्या कामकाजात हे चौथ्या क्रमांकावर प्रकरण होतं. पण प्रकरण सुनावणीस येण्यापूर्वींच चार वाजता कोर्टाचं कामकाज संपलं. त्यामुळे पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भातील सुनावणी पुढं ढकलली आहे. आता पुढची सुनावणी कधी होणार याची […]